Akola News 
अकोला

Paras Accident: पारसमध्ये मृत्यू झालेले ते ७ जण आले होते अघोरी उपचारांसाठी ; अंनिसचा धक्कादायक दावा!

Sandip Kapde

अकोला जिल्ह्यातील पारस येथे रविवारी टिनशेडवर झाड पडून सात जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले. अकोल्यातील पारस गावात हा अपघात झाला.

बाबूजी महाराज संस्थान येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी सुमारे ४० जण गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास येथे मुसळधार पाऊस सुरू झाला आणि जोरदार वारे वाहू लागले. त्यामुळे एक झाड उन्मळून पडून टिनाच्या शेडवर पडले ज्याखाली सर्व भाविक जमले होते. यातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

दरम्यान या प्रकरणी धक्कादाय माहिती समोर आली आहे. या सर्व मृत्यूंना अंधश्रद्धा आणि अघोरी उपचार जबाबदार आहेत, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. राज्यभरातून या ठिकाणी शारीरीक आणि मानसिक व्याधी असणारे जवळपास ४ ते ५ हजार रुग्ण उपचारासाठी येतात. (Akola News)

काल देखील संस्थानकडून या रुग्णांवर लिंबू आणि अंगारा देऊण किंवा लिंबू डोळ्यामध्ये टाकून अघोर उपचार करण्यात येत होते, स्थानिक ग्रामस्थांनी ही माहिती दिली आहे. संस्थानचे अध्यक्ष मोतीराम इंगळे यांनी देखील ही बाब मान्य केली आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोलाचे अध्यश शरद वानखेडे म्हणाले, "काल बाबूजी संस्थान येथे जी नैसर्गिक दुर्घटना झाली. त्यात ७ लोकांचा बळी गेली, ही अतिशय  दुःखदायक घटना होती. या घटनेच्या बाबतीत मागचा इतिहास पाहीला तर हे ७ बळी अंधश्रद्धचे बळी आहेत."

"अनेक लोक सांगतात की दर आठवड्याला या ठीकाणी दरबार भरत होता. या ठिकाणी अघोरी उपचार होत होते. त्यामुळे जादूटोणा कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी," अशी मागणी अंनिसते शरद वानखेडे यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : सिनेमागृहात कर्मचाऱ्याने चाकूचा धाक दाखवून दिली धमकी

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT