to stop farmers loss complaint against Agriculture Director to the collector akola Sakal
अकोला

Akola News : शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी; कृषी केंद्र संचालकांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अकोला जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे होतअसलेल्या बियाण्याच्या पुरवठ्यात अनियमितता करून शेतकरी वर्गाची आर्थिक लुट होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : सोयाबीन, कापूस बियाण्यांची कृत्रीम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वाढीव दरात बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र संचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी गोपाल पोहरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

अकोला जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे होतअसलेल्या बियाण्याच्या पुरवठ्यात अनियमितता करून शेतकरी वर्गाची आर्थिक लुट होत आहे. जिल्ह्यात काही सोयाबीन आणि कपाशी बियाण्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून दिवसाढवळ्या आमच्या शेतकरी बापाला लुटण्याचा घाट घातल्या जात आहे.

देशाविषयी, संविधानविषयी नितांत प्रेम भावना आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या ह्‍दयात आजच्या घडीस सुद्धा जागृत असल्यामुळे तसेच सध्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता असून त्याचा भंग होऊ नये म्हणून उग्र आंदोलन न करण्याचा पावित्रा आम्ही घेतला आहे.

मात्र आज रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा डोळ्यादेखत होत असलेला छळ अक्षरशः मुघल, इंग्रज शासकापेक्षाही क्रूर आहे, एकंदरीत प्रशासनाने जाणिवपूर्वक ही परिस्थिती निर्माण करून कोट्यवधीची रक्कम अवैध पद्धतीने शेतकऱ्यांकडून लुटण्याचा घाट घातला आहे.

अश्या जुलमी राज्यात आमच्या कडून कधीही उग्र आंदोलन होऊन आदर्श आचारसंहिता भंग होऊ शकतो, यावर तसेच कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित कंपन्या आणि पुरवठा करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

हृदयद्रावक घटना! 'टिप्परच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू'; आजारी मुलाला शाळेतून आणताना गुरसाळेत काळाचा घाला..

Success Story:'शेतकऱ्याची मुलगी बनली न्यायाधीश'; ऐश्वर्या यादव यांनी मिळवली १२ वी रँक; रात्रदिवस अभ्यास करुन यशाला घातली गवसणी..

Daily Walking Benefits: रोज चालणे शरीरासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

SCROLL FOR NEXT