अकोला

दहावीच्या शिक्षकांची दमछाक, परीक्षेसाठी निरोप पाठवून दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा : राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली, तरी मूल्यमापन करून निकाल नियोजित वेळेत विभागीय मंडळाकडे पाठवायचा आहे. त्या दृष्टीने शिक्षणाचे प्रयत्न सुरू आहेत. तीन भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा व विज्ञान विषयाचे प्रकल्प अहवाल यासाठी विद्यार्थ्यांना निरोप पाठवण्यात येत आहेत. पण काही विद्यार्थी बाहेर गावी गेले आहेत तर काही दुर्लक्ष करीत आहेतय. त्यात दहावीच्या शिक्षकांची दमछाक होत आहे. (Trouble to 10th grade teachers, neglect by sending messages for exams)


कोरोनाची असामान्य स्थिती उद्भवल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून या वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. निकालासाठी नववी व अकरावीच्या गुणांचा आधार घेवून तसेच यावर्षी घेतलेल्या प्रथम सत्र परीक्षा किंवा स्वाध्याय किंवा चाचण्या आदींचा विचार करून गुण पाठवायचे आहेत. सोबतच तीन भाषा विषयाच्या तोंडी परीक्षेचे गुण देण्यासाठी विद्यार्थी हजर असणे आवश्यक आहे तसेच इतर विषयाचे अहवाल लेखन पूर्ण करून संबंधित विषय शिक्षकांकडे द्यायचे आहेत. त्या वरून गुण देण्यात येतील. हे सर्व नियोजित वेळेत पूर्ण करून मंडळ कार्यालयाला पाठवायचे आहे. त्यासाठी शिक्षक ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरले त्यांना निरोप देत आहेत. फोन करत आहेत. काहींच्या घरी जाऊन पालकांना सांगत आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही प्रविष्ट विद्यार्थी बाहेर गावी गेले आहेत. विद्यार्थ्यांना निरोप पाठवून ही येत नसल्याने शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे.



अनुत्तीर्ण झाल्यास खापर शिक्षकांचा माथी
जर विद्यार्थी ,अहवाल,स्वाध्याय,बहु पर्यायी प्रश्णांची उत्तरे लेखी स्वरूपात देणार नाहीत तसेच भाषा विषयाच्या तोंडी परीक्षेसाठी उपस्थित राहणार नाहीत तर गुण कसे द्यायचे. गुण पाठवले नाहीत तर विद्यार्थी नापास होतील. त्याचे खापर शिक्षकांच्या डोक्यावर फोडले जाईल. पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे अशी अपेक्षा शिक्षक व्यक्त करत आहेत.

Trouble to 10th grade teachers, neglect by sending messages for exams

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT