Urea Second Dose Avoid Otherwise In Production Will Decrease Punjabrao Deshmukh
Urea Second Dose Avoid Otherwise In Production Will Decrease Punjabrao Deshmukh  sakal
अकोला

अकोला : युरीयाची दुसरी मात्रा टाळा, अन्यथा उत्पादनात येईल घट

सकाळ वृत्तसेवा

अकोला : हरभरा पिकाला फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास उत्पादनात ३० टक्केपर्यंत घट येऊ शकते. त्यासोबत युरीयाद्वारे नत्राची दुसरी मात्रा दिल्यास घाटे धारणा घटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे युरीयाची दुसरी मात्रा देण्याचे टाळावे, असा सल्ला डॉ.पंजाबराव देशमख कृषी विद्यापीठाच्या विस्तार कृषी विद्यावेत्ता विभागाचे डॉ. विनोद खडसे यांनी दिला आहे.

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाचे शेती आणि मानवी आहारात अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल प्रती हेक्टरपर्यंत जाऊ शकते, असा अनुभव आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करुन पीक उत्पादन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून सुधारित वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते. याच अनुषंगाने रिलायन्स फाऊंडेशन आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी संयुक्त पणे हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी यू ट्यूब लाईव्ह हा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये डॉ. विनोद खडसे व डॉ. प्रज्ञा कदमयांनी सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हरभरा लागवड करताना पेरणी वेळवर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा उत्पादनात विलक्षण घट येते.

बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक त्यानंतर जैविक रायझोबियम, ट्रायकोडर्मा संर्वधके चोळावेत. पिकाला खत देतांना पेरणीच्या वेळेसच नत्र, स्पुरद व पालाशाची संपूर्ण मात्रा द्यावी. वाढीसाठी नत्राची दुसरी मात्रा देऊ नये. त्यामुळे घाटे धारणा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पीक उधळू नये म्हणून १०० किलो शेणखतात एक किलो ट्रायकोडर्मा बुरशीनाशक मिसळून पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळावे. पाणी दिले तर पीक उभाळण्याचा धोका वाढतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सेंमी पाणी लागते.

प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ से.मी) देणे महत्त्वाचे असते. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते. किडरोग व्यवस्थापणावर सविस्तर मार्गदर्शन करतांना डॉ. प्रज्ञा कदम यांनी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभऱ्यावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे प्रती एकरी आठ पक्षी थांबे लावावे. जैविक नियंत्रणाकरिता एकरी दोन ते तीन कामगंध साफळे पिकाच्या उंचीच्या वर लावावे.

हरभरा पिकात एक ते दोन घाटे अळ्या प्रति मीटर ओळीत म्हणजेच आर्थिक नुकसानीची पातळी आढळल्यास कीटकनाशकाची पहिली फवारणी फुलोऱ्यावर असताना करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रामधून शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतराला विरोध करणारी स्थानिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Met Gala 2024 : किम कार्देशीयनने मेट गालामध्ये लावली चक्क स्वेटरमध्ये हजेरी ; फॅन्स झाले नाराज

Sharad Pawar: विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, इंडिया आघाडी म्हणजे १९७७ मधला जनता पक्ष, शरद पवार काय म्हणाले?

Ajit Pawar : कारखाने बंद पाडायचा माझा उद्योग नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

SCROLL FOR NEXT