अकोला

खरीप पेरणीसाठी घरचे सोयाबीन बियाणे वापरावे

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि.अकोला) : कोरोनाने सगळीकडे थैमान घातले असून लॉकडाउनमुळे भविष्यात पेरणीसाठी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरचे चांगले सोयाबीन बियाणे येत्या खरीप हंगामाकरिता पेरणीसाठी वापरावे असे आवाहन बाळापूर तालुका कृषी विभागाने केले आहे. Use home grown soybean seeds for kharif sowing

बाळापूर तालुक्यातील दधम येथे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून येत्या हंगामात घरी राखून ठेवण्यात आलेल्या बियाण्यांचा बिज प्रक्रिया करून पेरणीसाठी वापर करावा व विविध बिज प्रक्रिया, निंबोळी अर्क तयार करणे, बिबीएफ यंत्राचा वापर करण्यात यावा असे कृषी अधिकारी नंदकुमार माने यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. याच बरोबर रासायनिक खतांचा वापर कमी करावा असेही ते म्हणाले.

येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांच्या तुटवड्यामुळे भाववाढ शक्य आहे यामुळे शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरावे व बियाण्यावर होणारा जादा खर्च टाळून आपला उत्पादन खर्च कमी करावा. सोयाबिन बियाणे हे अतिशय नाजूक असल्याने विशेष काळजी घ्यावी, घरच्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहावी उगवण क्षमता चांगली असल्यास शिफारशीनुसार हेक्टरी बियाणे वापरावे, पावसात भिजलेले बियाणे वापरू नये, काडी कचरा असलेले बियाणे स्वच्छ करून पेरणीकरिता वापरावे, सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया तसेच पेरणी संदर्भात काही अडचणी असतील तर आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी नंदकुमार माने यांनी केले आहे.

Use home grown soybean seeds for kharif sowing

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT