Akola News: vanchit bahujan aaghadi supports 8th decembers bharat bandh 
अकोला

Bharat Band Updates  शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजनआघाडीचा पाठिंबा

विवेक मेतकर

अकोला : केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसाठी आणि शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर केला आहे.


देशभरातील शेतकऱ्यांनी या मागणीसाठी 8 डिसेंबर 2020 रोजी 'भारत बंद' ची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडी या 'बंद'मध्ये सहभागी होत असून सर्वांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सुध्दा करीत आहे.

उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे सरकारने रद्द करावेत. शेतमालाला किमान हमीभावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावे. बाजारभाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतक-याचा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तात्काळ 50% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची तरतूद कायद्यात करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे करीत आहे.

या बंदमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीकेले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणबाजी
वंचित बहूजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या.

प्रतिष्ठाणे बंद करण्याचा प्रयत्न
जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणा दिल्यानंतर वंचिच्या कार्यकर्त्यांच्या मोर्चा व्यापारी प्रतिष्ठाणांकडे वळला. शहरातील प्रतिष्ठाणे बंद करण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन करीत केंद्र सरकारविरोधात घोषणाही दिल्या. 

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT