rain esakal
अकोला

अकोला : पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, गणेशविसर्जनावेळी सतर्क राहण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात १५ ते २० सप्टेंबरपर्यंत दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा (akola rain update) अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (vidarbha weather forecast) व्यक्त करण्यात आला. त्यामुळे गणेशविसर्जनादरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यात ९८.१ टक्के सरासरी पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात वान प्रकल्पात ९१.८५ टक्के, काटेपूर्णा ९८.५८ टक्के, मोर्णा ८६.६० टक्के, निर्गुणा १०० टक्के, उमा ७०.९४ टक्के, दगड पारवा ९४.०१ टक्के, पोपटखेड ९२.०६ टक्के या प्रमाणे जलसाठा झाला आहे. तसेच अन्य लहान मध्यम प्रकल्पांतहई जलसाठा जमा झाला आहे. त्यातच हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही दिवसांत अधिक पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचना!

  • अचानक पूर येणारी क्षेत्रे उदा. नद्या, नाले, ओढे, ड्रेनेज, कॅनॉल इ. बाबत जागरुक रहावे.

  • विशिष्ट भागात पूर येण्याच्या शक्यतेबाबतही वेळोवेळी सूचित करण्यात येते त्याबाबत जागरुक रहावे.

  • पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. वाहनेही नेऊ नये.

  • पुराचे पाणी येण्याची शक्यता निर्माण झाल्यास जवळच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.

जिल्ह्यातील अतिसंवेदनशील ठिकाणे

  • अकोला तालुका - गांधीग्राम (पूर्णानदी), काटेपूर्णा नदी, कानशिवणी, कुरणखेड, अकोला एमआयडीसी परिसरातील खदानी.

  • बार्शीटाकळी तालुका - दोनद बु., दोनद खु.(काटेपूर्णा नदी), पुनोती तलाव.

  • अकोट तालुका - पोपटखेड प्रकल्प, केळीवेळी (पूर्णा नदी), वरुर (पठार नदी).

  • तेल्हारा तालुका - वांगेश्वर (पूर्णा नदी), भोकर (विद्रुपा नदी), मनब्दा (विद्रुपा नदी), तेल्हारा (गौतमा नदी).

  • बाळापूर तालुका - मन नदी, भिकुंड बंधारा, अंदुरा (पूर्णा नदी), बोरगाव वैराळे (पूर्णा नदी), निमकर्दा तलाव, पारस मन नदीवरील बंधारा.

  • पातुर तालुका - बोर्डी नदी, चौंढी येथील तलाव, विश्वमित्री नदी लघु प्रकल्प, गावंडगाव प्रकल्प.

  • मूर्तिजापूर तालुका - दुर्गवाडा (पूर्णा नदी), एंडली (पूर्णा नदी), पोही (उमा नदी), वाई प्रकल्प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT