village became a school walls became fruit First venture in Akola district sakal
अकोला

गाव झाली शाळा, भिंती झाल्या फळे; अकोला जिल्ह्यात प्रथम उपक्रम

अकोला जिल्ह्यातील आरखेड गावात ‘प्रथम’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील आरखेड या गावात ''प्रथम'' एज्युकेशन फाउंडेशन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातील भिंती ह्या अक्षर भिंती म्हणून झळकायला लागल्या आहेत.

शिक्षण हे चार भिंतीच्या आतच नसून शिक्षणाची द्वार हे खुल्या वातावरणात उघडे करून चालता बोलताना, खेळताना सुद्धा आपण शिकू शकतो आणि आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करू शकतो हा यामागचा उद्देश आहे.हा उपक्रम सर्वांनाच मुलांच्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे त्यामुळे सर्वं गावकऱ्यांनी यामध्ये हिरिरीने सहभाग नोंदवला.तसेच याच संकल्पनेतुन गावामध्ये ग्राम शिक्षा केंद्र सुद्धा स्थापन करून मुलांना त्यामध्ये स्पर्धा परीक्षा व इतरही विषयावर अभ्यास करण्यासाठी मदत व्हावी असा सर्व गावकऱ्यांचा हेतू आहे. अक्षरभिंती मुळे जणू काही गावातील मुले तसेच वयोवृद्ध सुद्धा या खुल्या शाळेमध्ये शिकत आहे.

या उपक्रमाला सहकार्य हे सर्व गावकऱ्यांचे लाभले. विशेष सहकार्य लाभले ते म्हणजे आरखेड ग्रामपंचायत चे सरपंच शेख जमिल शेख खलील, जिल्हा परिषद सदस्या रंजनाताई नरेश विल्लेकर, पंचायत समिती सदस्य दादाराव किर्दक व प्रकाश वानरे, पोलीस पाटील विजय वाकोडे, मुख्याध्यापक विजय डवरे, ग्रामसेविका दीपिका कुटेमाटे, तलाठी भाग्यश्री देशमुख,रोजगार सेवक संजय वाकोडे, माजी सरपंच, विजय लोडम, श्री विनायकराव वाकोडे श्री बाळू वर्घट ,ग्रामपंचायत सदस्य महादेव लोडम, नंदकिशोर वाकोडे ,आशा सेविका मंदा होले,अंगणवाडी सेविका रेखा ठोकळ,व समस्त ग्रामस्थ,प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे जिल्हाप्रमुख श्री सुनील इंगळे सर,सीआरएल अमोल नाईक व वैभव बाजड यांचे मार्गदर्शन ''अक्षर'' भिंती करिता उपयुक्त ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

SCROLL FOR NEXT