अकोला

खळबळजनक; पोलिस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर बळजबरी अत्याचार

सकाळ वृत्तसेवा


वाशीम
ः अन्याय व अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी पोलिसांची (Police) मदत घेतली जाते. खाकीच्या धाकाने गुन्हेगार गुन्हा करण्यास धजावत नाहीत. मात्र, वाशीम पोलिस (Washim Police) दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर परजिल्ह्यात नियुक्तीवर असलेल्ये एका पोलिस निरीक्षकानेच बळजबरी अत्याचार करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून वाशीम शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव विश्वकांत गुट्टे आहे. सध्या तो नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर (Ardhapur In Nanded) पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. (Washim: Police inspector forcibly tortures female police constable)


स्थानिक गुन्हे शाखा वाशीम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी यांच्यावर बलात्कार करून मारहाण केल्याप्रकरणी वाशीम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक असून, त्यांच्यावर ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास वाशीम शहर पोलिस करीत आहेत.

दरम्यान पोलिस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिसांत एकचं खळबळ उडाली आहे. वाशीमच्या मालेगाव पोलिस ठाण्यात २००७ मध्ये विश्वकांत गुट्टे पीएसआय या पदावर कार्यरत असताना सदर महिला पोलिस कर्मचाऱ्यांची ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी वाशीममध्ये आरोपी घरी आला असता त्यांनी जबरदस्ती करीत बलात्कार केला आहे. त्याप्रकरणी काल रात्री महिला पोलिस कर्मचारी यांनी वाशीम शहर पोलिसांत ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करीत असल्याचे पोलिस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितले.



सखोल तपासानंतर अटक
या प्रकरणातील आरोपी पोलिस निरीक्षक हा मालेगाव येथे कार्यरत होता. या कार्यकाळातच फिर्यादीची त्याच्यासोबत ओळख झाल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्वकांत गुट्टे यांचा फोन लागत नव्हता. या प्रकरणात सखोल तपास करून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी प्रतिक्रीया ठाणेदार ध्रुवास बावनकर यांनी दिली आहे. या घटनेने जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

संपादन - विवेक मेतकर

Washim: Police inspector forcibly tortures female police constable

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein Files: जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूनंतरही ‘काळा इतिहास’ उघड; कागदपत्रे कोण प्रकाशित करत आहे? नेमकी सुत्रे कुणाच्या हाती?

India T20 World Cup Squad: अजित आगकरने संघ जाहीर केला, तरी १५ जणांमध्ये होऊ शकतो बदल; ICC चा नियम काय सांगतो?

हिंजवडीला मी पुणे समजत नाही.... मराठी अभिनेत्रीचं बिनधास्त वक्तव्य चर्चेत, म्हणते- सॉरी पण मी...

North Maharashtra : उत्तर महाराष्ट्र गारठला! निफाडचा पारा ५.४ अंशांवर; यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

Latest Marathi News Live Update : इस्रोचे LVM3-M6 प्रक्षेपण २४ डिसेंबरला; व्ह्यू गॅलरीसाठी नोंदणी सुरू

SCROLL FOR NEXT