अवैध गौण खनिज वाहतुकीवर १९ पथकांचा वॉच!
अवैध गौण खनिज वाहतुकीवर १९ पथकांचा वॉच! sakal
अकोला

अवैध गौण खनिज वाहतुकीवर १९ पथकांचा वॉच!

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः गौण खनिजच्या अवैध वाहतूक व उत्खननावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १९ पथक कार्यान्वित होणार आहेत. सदर पथकांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलिस शिपायाचा समावेश राहणार असून पथकातील सदस्य तीन शिफ्टमध्ये चोविस तास तपासणी नाक्यांवर गस्त देतील. याव्यतिरिक्त सहा फ्लाईंग क्वॉड सुद्धा अवैध गौण खनिज वाहतुकीला लगाम लावण्यासाठी काम करतील. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननासह वाहतुकीवर आळा बसेल.

जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात गौण खनिज उपलब्ध आहे. त्यामध्ये माती, मुरूम, गिट्टी, वाळूसह दगळ व इतर बाबींचा समावेश आहे. या गौण खनिजचे अवैधरित्या उत्खनन करुन त्याची विक्री करणाऱ्या टोळ्या सुद्धा सक्रिय आहेत. या टोळ्यातील सदस्य रात्रीच्या अंधारात गौण खनिजचे अवैध उत्खनन करुन त्याची वाहतूक करतात आणि त्याची मोठ्‍या भावाने विक्री करतात. या अवैध गौण खनिज उत्खननावर आळा बसावा यासाठी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी तपासणी नाके, बैठे पथक व फ्लाईंग क्वॉड (पथक) मार्फत गस्त करुन अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यात येतो. परंतु पथक व तपासणी नाके कमी असल्याने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर शंभर टक्के लगाम लावण्यात प्रशासनाला यश मिळत नाही. त्याचा फायदा घेत गौण खनिज माफिया अवैध वाहतूक व उत्खनन करतात. परंतु आता घटनांवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १९ बैठे पथक (तपासणी नाके) कार्यान्वित होणार आहेत. सदर पथकात प्रत्येकी दोन कर्मचारी एका शिफ्टमध्ये कार्यरत राहतील, तर रात्रीच्या वेळी पोलिस शिपाई पथकामध्ये सेवा देईल. त्यामुळे गौण खनिजची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यास आळा बसेल.

"गौण खनिज अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर आळा बसावा यासाठी जिल्ह्यात १९ पथक कार्यान्वित होणार आहेत. सदर पथक तपासणी नक्यांवर कार्यान्वित राहणार असले तरी प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर फ्लाईंग क्वॉड सुद्धा कार्यरत राहील."

- प्रणिता चापले, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला

असा राहणार पथकांचा वॉच

तालुका पथक संख्या

  • अकोला ०५

  • बार्शीटाकळी ०३

  • पातूर ०२

  • अकोट ०३

  • मूर्तिजापूर ०२

  • बाळापूर ०४

  • एकूण १९

फ्लाईंग क्वॉड लक्ष ठेवणार

तपासणी नाक्यावरील पथकांसह गौण खनिजच्या अवैध वाहतुकीवर लगाम बसावा यासाठी फ्लाईंग क्वॉड सुद्धा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार व इतरांचा समावेश असेल. संबंधित पथक तालुक्यामध्ये कारवाई करेल. याव्यतिरिक्त जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचे विशेष पथक सुद्धा जिल्हास्तरावर कारवाई करेल.

पथकांची संख्या वाढली

जिल्ह्यात सुरुवातीला सहा तपासणी नाक्यांवर पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये नंतरच्या काळात वाढ करुन ते १३ करण्यात आले. तर आता १९ पथक कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे गौण खनिज माफियावर लगाम लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT