Water supply construction department Commissioner audit report of akola corporation
Water supply construction department Commissioner audit report of akola corporation  sakal
अकोला

अकोला : लेखा परीक्षणातील आक्षेपांकडे पाठ!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिकेच्या सन २०१२-१३ पासून लेखा परीक्षण अहवालातील आक्षेपित मुद्द्यांची पूर्तता संबंधित विभागांनी अद्याप केली नाही. त्यामुळे अनियमिततेला पाठीशी घातले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही गंभीर बाब ओळखून सोमवारी (ता. २१) मनपा आयुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बांधकाम व जलप्रदाय विभागाची झाडाझडती घेतली व अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक व शासन निधीचा विनियोग करताना राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अनियमितता होऊ नये म्हणून लेखा परीक्षण केले जाते. या लेखा परीक्षण अहवालात काढण्यात येणाऱ्या आक्षेपांची पूर्तता संबंधित विभागांनी तातडीने करून घेणे आवश्यक असते. मात्र, अकोला महानगरपालिकेतील अनेक विभागांनी सन २०१२-१३ पासून लेखा परीक्षणातील आक्षेपांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यामध्ये मनपाचा जलप्रदाय व बांधकाम विभाग आघाडीवर असून, इतर विभागातील लेखा पॅरे आक्षेपित असताना त्याचा संबंधित विभागाकडून पाठपुरावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे होणाऱ्या अनियमिततेला खतपाणी घालण्याचे प्रकार अकोला महानगरपालिकेत होताना दिसत आहे. मनपाचे सन २०१८-१९ पर्यंत लेखा परीक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित लेखा परीक्षण सुरू आहे. जे लेखा परीक्षण पूर्ण झाले त्यातील आक्षेपित मुद्द्यांची पूर्तता करण्यासंदर्भात जलप्रदाय व बांधकाम विभागाकडून होत असलेले दुर्लक्ष गंभीर स्वरूपाचे असल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी दोन्ही विभागात जाऊन स्वतः अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

बांधकामचे २००, जलप्रदायचे ५० आक्षेप प्रलंबित

सन २०१२-१३ पासून ते २०१८-१९ पर्यंत झालेल्या लेखा परीक्षणातील आक्षेपित बाबींची पूर्तता करण्यात सर्वात मागे मनपाचा बांधकाम विभाग आहे. या विभागाचे २०० तर जलप्रदाय विभागाचे ५० पेक्षा अधिक आक्षेपित पॅरे आहेत. त्याची पूर्तता होत नसल्याने दरवर्षीच्या अहवालात त्यावर लेखापरीक्षकांकडून ठपका ठेवला जातो. हीबाब गंभीर असून, प्रशासकीय स्तरावर अनियमिततेला खतपाणी घालणारी आहे.

आयुक्तांकडून कानउघाडणी, अधिकारी कामाला!

महानगरपालिकेच्या विविध विभागातील लेखा परीक्षणाच्या आक्षेपित पॅऱ्यांची पूर्तता होत नसल्याने मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी स्वतः बांधकाम व जलप्रदाय विभागात जाऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. आयुक्तांच्या कानउघाडणीनंतर दोन्ही विभागातील अधिकारी, कर्मचारी तातडीने कामाला लागले आहेत.

अनेक फाईल्स गहाळ

लेखा परीक्षणातील आक्षेपित अहवालांची पूर्तता न झाल्याने संबंधित कामे व योजनांबाबतच्या फाईल्स जलप्रदाय व बांधकाम विभागात शोधल्या जात आहेत. मात्र, अनेक फाईल्स या विभागातून गहाळ झाल्या असल्याचे आयुक्तांच्या पाहणीतून दिसून आले. या फाईल्सची शोधाशोध करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT