दुसरबीड (बुलडाणा) : मेहकर ते सिंदखेड राजा राज्यमहामार्गावर दुसरबीड असून, हे गाव तालुक्यातील मध्यस्थानी असल्याने येथे जवळपास 15 ते 20 खेडे जुळले असल्याने येथे मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी दर मंगळवारी बाजार भरत असतो. परंतु, कोरोनाच्या काळामध्ये जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार आठवडी बाजार बंदीमुळे गेल्या दोन आठवड्यापासून बाजार बंद होता. आज (ता.23) बाजारपेठेत सदर बाजार न भरता चक्क राज्य महामार्गावरच बाजार भरल्याने दिवसभर वाहतुकीस अडचण झाली तसेच सोशल डिस्टींगचा फज्जा उडाला. कोणाच्याही तोंडाला माक्स नसल्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला येथे खो बसला.
गेल्या दोन आठवड्यापासून येथील बाजार ग्रा. प. च्या व प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला होता. आज मात्र, खेड्यापाड्याच्या शेतकरी वर्ग व भाजीपाला व्यापार्यांनी आपला भाजी भाजीपाले घेऊन आठवडी बाजार पेठेत दुकाने न लावता राज्यमहामार्गावरच बाजार भरवला असल्याने दिवसभर रोडवर ट्रॅफिक जाम होऊन मोठ मोठाल्या तसेच फोर व्हीलर,टू व्हीलर वाहन चालकांना खूपच त्रास सहन करावा लागला तालुक्यात व दुसरबीड येथे अगोदरच रुग्ण असून त्यात रोजच वाढ होत आहे असे असताना अशाप्रकारची गर्दी जमल्याने रुग्णसंख्येत वाढ होणार त्यामुळे याकडे संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे नागरिक सांगत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने मागील आठवड्यात दौंडी देऊन परिसरातील शेतकरी व व्यापार्यांना कळविले होते की आठवडी बाजार बंद राहील त्या अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये बाजार भरला नाही तरी या आठवड्यामध्ये शेतकरी वर्ग व कास्तकार व्यापारी यांनी त्या आदेशाला न जुमानता आज रस्त्यावर बाजार थाटला त्यामुळे संबंधित विभागाने येणार्या पुढील आठवडी बाजारासाठी शेतकर्यांना व्यापार्यांना आरक्षित जागेवरच सोशल डिस्टंसिंग या नियमानुसार आठवडी बाजार भरावा अशी यावेळी व्यापारी वर्ग व शेतकरी वर्गांनी आपली मते व्यक्त केली.
जिल्हाधिकारी यांनी 31 मार्चपर्यंत जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये व्यापार्यांसाठी एक तासाची सूट व वेळ ठरवून दिलेली असतानाही दुसरबीड बाजारपेठेमध्ये ही नियमाचे उल्लंघन होत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.