अकोला

अकोला : नव वर्षाचे स्वागत निर्बंधात!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात सर्वत्र ३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्ट्यांचे बेत आखले जात असतानाच राज्य शासनाकडून प्राप्त सुचनांच्या आधारे जिल्हा प्रशासनाने(akola district administration) रात्रीची जमावबंदी(Curfew) लागू केली आहे. त्यामुळे रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी लावण्यात आली आहे. सुधारित निर्बंधानुसार सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, तसेच लोकांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणांवर उपस्थिती संख्येबाबत मर्यादा घालून देण्यात आली असल्याने नागरिकांना नवीन वर्षांचे(new year) स्वागत निर्बंधातच करावे लागणार आहे.

ओमिक्रॉन(omicron) प्रकारच्या कोविड विषाणूचा संसर्ग फैलावत आहे. त्यास आळा घालण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मान्यतेने अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे(sanjay khadse) यांनी शनिवार (ता. २५) पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश निर्गमित केले आहेत. हे आदेश पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील. या संदर्भात आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात शनिवार २५ डिसेंबर पासून रात्री ९ ते सकाळी ६ यावेळात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मान्यतेने जमावबंदी आदेश लागू राहिल. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्‍यक्तींवर, आस्‍थापनेवर दंडात्‍मक कारवाई करण्यात येईल. या बाबत काटेकारपणे तपासणी व अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्‍ती प्राधिकारी, आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलिस अधीक्षक, महसूल विभाग तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालिका, नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील, असा उल्लेख जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात करण्यात आला आहे.

असे आहेत नवे निर्बंध

  1. लग्‍नसोहळा व लग्‍न संमारंभाच्‍या बाबतीत, जेथे उपस्थितांची एकूण संख्या ही बंदिस्त जागा, हॉल, मेजवानी, मॅरेज हॉल इत्यादी या ठिकाणी १०० पेक्षा जास्त नसावी. तसेच खुल्‍या जागेकरिता उपस्थितांची मर्यादा २५० किंवा जागेच्‍या क्षमतेच्‍या २५ यापैकी जी कमी असेल तितकी असावी.

  2. इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची उपस्थिती सामान्यतः संपूर्ण कार्यक्रमात सतत असते, तेथे उपस्थितांची एकूण संख्या देखील बंद जागेसाठी १०० आणि खुल्या जागेसाठी २५० किंवा जागेच्‍या क्षमतेच्‍या २५ टक्के यापैकी जी कमी असेल.

  3. जागेच्‍या क्षमतेच्या २५ टक्के आणि ज्‍या जागेची क्षमता निश्चित केलेली नाही. अशा बाबतीत संबंधित परवाना, परवानगी देणाऱ्या प्राधिकरणाने निश्चित केलेल्या क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त नसावेत.

  4. क्रीडा, इव्हेंट्स, स्पर्धांच्या बाबतीत, जागेच्‍या एकूण प्रेक्षक संख्येच्या २५ टक्के पेक्षा जास्त नसलेल्या ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात.

  5. हॉटेल, रेस्टॉरंट्स, जिम्नॅशियम, योगा सेन्‍टर, स्पा, सिनेमा हॉल आणि चित्रपटगृहे व इतर मनोरंजन केन्‍द्रे ही एकूण आसण क्षमतेच्‍या ५० टक्के क्षमतेने कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करुन सुरु ठेवता येतील. संबंधित आस्थापनांनी परवाना, परवानगी तसेच एकूण आसन क्षमता व ५० टक्के क्षमता दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील.

  6. सर्व संबंधित आस्‍थापना यांनी तेथील व्‍यवस्‍थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्र पूर्ण व दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर १४ दिवस पूर्ण झाले असल्याबाबत खात्री करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT