अकोला

ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्यासाठी संयुक्तरित्या काम करा!

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस, महसूल यंत्रणा व ग्रामविकास प्रशासनाने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे. ग्रामस्तरीय समितीचा सहभाग घेऊन गावात निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. Work together to prevent corona in rural areas!

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रशासनातील महत्त्वाचे घटक असलेले पोलिस स्टेशन प्रभारी, गटविकास अधिकारी ते ग्रामसेवक, तहसीलदार ते मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासोबत जिल्हाधिकारी पापळकर यांनी शुक्रवारी (ता. ७) ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पोलिस उपअधीक्षक सचिन कदम, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशनचे प्रभारी, गटविकास अधिकारी आदी सहभागी झाले होते.

अशा दिल्या सूचना

- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये लहान लहान गावांतून लोकांची ये-जा सुरु असते, त्यावर नियंत्रण आणावे असे निर्देश दिले.

- पोलीस अधिकाऱ्यांनी अकारण फिरणारे, दुकानांवर होणारी गर्दी, अकारण होणारी वाहतूक यावर नियंत्रण मिळवावे, असे निर्देश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले.

विवाह समारंभांवर लक्ष ठेवा!

कोरोना निर्बंधांची अंमलबजावणी अधिक कडक पद्धतीने कशी करता येईल, यासाठी तालुका व उपविभागीय स्तरावर बैठक घेऊन नियोजन करावे. आपापल्या कार्यक्षेत्रात होत असलेले विवाह समारंभांवर करडी नजर ठेवावी. गावातून बाहेर गावी जाण्या येण्यासाठी सबळ (बहुदा वैद्यकीय) कारण असल्याशिवाय परवानगी देऊ नये. ज्या-ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागातील चाचण्या वाढविल्या पाहिजेत. प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी केल्यास ग्रामीण भागात होत असलेला फैलाव आपण रोखू शकू, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.

संपादन - विवेक मेतकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT