Gulabi Bondali.jpg 
अकोला

टोळधाडीची अनिश्चित वाट, गुलाबी बोंडअळीचा मात्र धोका दाट

अनुप ताले

अकोला : पिकांचा कर्दनकाळ समाजल्या जाणारी कीड ‘टोळधाड’ अमरावतीपर्यंत पोहचल्याने, वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या छातीचे ठोके वाढले होते. आता मात्र टोळधाडीपेक्षा, गेल्या वर्षीचा लांबलेला कापूस हंगाम अन् रेंगाळेल्या कापूस खरेदीमुळे गुलाबी बोंडअळीचे संकट वऱ्हाडात गडद झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांनी सतर्क राहून, गुलाबी बोंडअळीला रोखण्यासाठी योग्य ते व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

‘गुलाबी बोंडअळी’ म्हणजे कापूस पिकावरील आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट ठरले आहे. या संकटापासून कापूस उत्पादकांना वाचविण्यासाठी, गुलाबी बोंडअळीसह रस शोषण करणाऱ्या अळीला प्रतिकारक्षम असणारे बीटी कपाशी वाण तयार करण्यात आले होते. परंतु, गुलाबी बोंडअळीने स्वतः मध्ये बदल करून बीटी कपाशीवरही 2017 मध्ये हल्ला चढविला आणि संपूर्ण कापूस हंगाम उद्‍ध्वस्त केला. त्यानंतर मात्र कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी व इतर संस्थांच्या सांघिक प्रयत्नातून गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत करण्यात यश आले आणि 2018 व 2019 मध्ये कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रित राहाला. परंतु, 2019 मध्ये कापूस हंगाम लांबला. उशिरा पेरणी व उशिरापर्यंत कापूस वेचणी सुरू होती. मे मध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी शेतशिवारात पऱ्हाटीचे पीक उभे होते. शिवाय अजूनही कापूस खरेदी प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांच्या घरात आणि जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे. त्यामुळे शेतात व गावांमध्येसुद्धा गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत होऊ शकले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून येत्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळी जोरदार हल्ला चढवू शकते, अशी शक्यता कृषी अभ्यासक व कृषी तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांनी सतर्क राहावे
गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत करण्यासाठी फरदळीचा कापूस न घेण्याचे व मॉन्सूनपूर्व कापूस लागवड न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. परंतु गेल्या वर्षी कापूस पेरणी उशिरा झाल्याने, उशिरापर्यंत कापूस वेचणी सुरू होती. शिवाय शेतकऱ्यांच्या घरात व जिनिंगमध्ये कापूस असून, लवकरच खरिपातील कापूस लागवडीला सुरुवात होईल. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत होणे कठीन असून, 2017 ची पुनरावृत्ती सुद्धा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून, गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी आवश्यक कीड व्यवस्थापन करावे.
- डॉ.धनराज उंदीरवाडे, किटकशास्त्र विभाग प्रमुख, डॉ.पंदेकृवि अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT