A young man has been hit in the head with an iron rod in a trivial dispute at Motala  
अकोला

क्षुल्लक वादातून युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (बुलडाणा) : क्षुल्लक वादातून एका युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी करणाऱ्या चौघा आरोपींविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी गुरुवारी (ता.१८) गुन्हा दाखल केला आहे. 

शिवाजी वसंतराव देशमुख (३०, रा. मोताळा) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, मंगळवारी (ता.१६) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास त्यांचा भाऊ गणेश देशमुख (२८) यांना गावातीलच दीपक सुरगडे, नितीन सुरगडे, सचिन सुरगडे, गजानन सुरगडे या चौघांनी मारहाण केली. दरम्यान, गणेशने त्यांना मारहाणीचे कारण विचारले असता, तू दारू पिऊन आम्हाला शिवीगाळ का करतो? असे म्हणून आरोपी गजानन सुरगडे याने गणेशच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. तर, नितीन सुरगडे याने बांबूच्या काठीने मारहाण केली. फिर्यादी शिवाजी देशमुख हे सोडवासोडव करत असताना, आरोपींनी त्यांना लोटपाट करून जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी गणेश यांच्यावर मोताळा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

याप्रकरणी शिवाजी वसंतराव देशमुख यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी दीपक सुरगडे, नितीन सुरगडे, सचिन सुरगडे, गजानन सुरगडे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ मिलिंद सोनुने करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT