पानपिंपरी sakal
अकोला

अकोला : विभागीय शेती विकास अभियान समितीस मान्यता

पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पानपिंपरी,पानवेली व औषध उत्पादक शेतकऱ्यांच्या ४० वर्षांच्या लढ्याला यश मिळाले आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अमरावती विभागीय पानवेली , पानपिंपरी, औषध उत्पादक शेतकरी विकास अभियान समितीस शासनाने मान्यता दिली आहे.

अमरावती विभागातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, अकोला जिल्ह्यातील अकोट, हिवरखेड , तेल्हारा व बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, वरवटबकाल तसेच जळगाव खानदेशातील काही भागात पानवेली व पानपिंपरीचे उत्पादन घेतले जाते. बारी समाज बांधवांकडून पारंपरिक रित्या हे पीक घेतले जात आहे. गेल्या काही दिवसात या पिकांवरील रोग तसेच बाजारभावातील अनियमितता, रखडलेले शासकीय अनुदान यामुळे पानपिंपरी, पानवेली व एकूणच औषध वनस्पती उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत.

त्यामुळे या भागातील पानपिंपरी व पानवेली हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आमदार कडू यांनी ता.२० ऑक्टोबर २०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीतच आ. कडू यांनी पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करून शासनाला शिफारसी सादर करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी शेतकरी प्रतिनिधी व आयुक्त तसेच कृषी विभागाचे अधिकारी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ञ यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावास शासनाचे कृषी विभागाने ता. २८ एप्रिल २०२२ रोजी मान्यता दिली. पानपिंपरी व पानवेली औषध उत्पादक शेतकरी विकास समिती स्थापन करण्याचे निर्देश दिलेत.

समिती अभ्यास करून शिफार करणार

पानपिंपरी व पानवेलीच्या संशोधन तसेच पिकावरील रोग व शेतकऱ्यांना करावे लागणाऱ्या समस्यांचा सामना, राष्ट्रीय या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, बाबत शासनाला प्रस्ताव व शिफारशी सादर करेल व त्या अनुषंगाने शासनाने कारवाई करायची आहे. सदर समितीला शासकीय दर्जा मिळाल्यामुळे पानवेल व पानपिंपरी व उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT