share marketing latest news Esakal
अर्थविश्व

Stock: या हॉटेल स्टॉकचा 6 महिन्यात 141% रिटर्न

स्टॉकने एका महिन्यात सुमारे 49 टक्के, सहा महिन्यांत 141 टक्के परतावा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

रॉयल ऑर्किड हॉटेल्सच्या (Royal Orchid Hotels Ltd.) स्टॉकमध्ये गेल्या 5 दिवसांत 21 टक्क्यांची मजबूत तेजी दिसून आली आहे. शुक्रवारी इंट्राडेमध्ये बीएसईवर  हा स्टॉक 5 टक्क्यांहून वाढून 307.70 रुपयांवर पोहोचला.

एका महिन्यात 49% वाढ

रॉयल ऑर्किड हॉटेल्सच्या (Royal Orchid Hotels Ltd.) स्टॉकने एका महिन्यात सुमारे 49 टक्के, सहा महिन्यांत 141 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, स्टॉक 2022 मध्ये 245 टक्के आणि एका वर्षात 190 टक्के वाढला आहे. आणि विशेष म्हणजे दोन महिन्यांत त्याच्या गुंतवणूकदारांची रक्कम जवळजवळ दुप्पट झाली आहे. हा स्टॉक 18 जुलै 2022 रोजी 147.30 रुपयांच्या पातळीवर होता आणि 23 सप्टेंबर रोजी 303 रुपयांवर आहे.

कंपनी काय करते ?

रॉयल ऑर्किड हॉटेल्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी हॉटेल चेन आहे. यात फाइव्ह स्टार, फोर स्टार आणि रिसॉर्ट्सचा समावेश आहे. ही कंपनी बिझनेस आणि लीझर ट्रॅव्हलर्सना टारगेट करते. कंपनी सध्या भारतात 72 हॉटेल्स चालवते.

जून तिमाही निकाल

जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 64 टक्क्यांनी वाढून 38.08 कोटी झाला आहे, जो मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत 23.17 कोटी रुपये होता. त्याच वेळी, या काळात प्रॉफिट आफ्टर टॅक्स 2.78 कोटी रुपयांवरून 6.88 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून, कंपनीने ऍसेट लाइट मॉडेलमध्ये प्रवेश वाढवण्यावर भर दिला आहे. यामध्ये मालमत्ता भाड्याने घेणे आणि मालमत्तेच्या मालकांशी मॅनेजमेंट कॉट्रॅक्ट करण्याचा समावेश आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT