Best Stocks to Buy sakal
अर्थविश्व

कॅश मार्केटचे 2 बेस्ट शेअर्स, तज्ज्ञ काय सांगतायत पाहूया...

Stocks to buy: शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी 2 मजबूत स्टॉक्स निवडले आहेत. हे दोन्ही शेअर्स कॅश मार्केटमधले आहेत.

शिल्पा गुजर

Stocks to Buy: शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी 2 मजबूत स्टॉक्स निवडले आहेत. हे दोन्ही शेअर्स कॅश मार्केटमधले आहेत. प्लास्टीबेंड्स इंडिया (Plastiblends India) आणि एजिस लॉजिस्टीक (Aegis Logistics) सध्या खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या बाजारात अस्थिरतेचं वातावरण आहे, अशा वेळी आहे पण या शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे कमावता येतील असे त्यांचं म्हणणं आहे.

प्लास्टीबेंड्स इंडिया (Plastiblends India)-

प्लास्टीबेंड्स इंडिया (Plastiblends India) प्लास्टिक प्रक्रिया उद्योगाशी संबंधित व्यवसाय करते. जवळपास 40 देशांमध्ये त्याची निर्यात होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कंपनीचे फंडामेंटल्स खूप मजबूत आहेत. डेट इक्विटी रेशो जवळपास 0.10 आहे. lस्टॉक्स अतिशय स्वस्त पीई मूल्यांकनांवर उपलब्ध आहेत. प्रमोटर्स स्वतःचा हिस्सा सतत वाढवत आहेत.

प्लास्टीबेंड्स इंडिया (Plastiblends India)

सीएमपी (CMP) - 241.50 रुपये

टारगेट (Target) - 255 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 234 रुपये

एजिस लॉजिस्टीक (Aegis Logistics)

विकास सेठींनी एजिस लॉजिस्टीक (Aegis Logistics) हा कॅश मार्केटमधून दुसरा स्टॉक निवडला आहे. हे देशातील आघाडीचे लिक्विड टर्मिनल ऑपरेटर आहे ज्याचे देशभरात 6 टर्मिनल आहेत. डिसेंबर तिमाहीत त्याचा पीएटी (profit after tax) 109 कोटी होता, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत पीएटी (profit after tax) 78 कोटी होता. याचेही फंडामेंटल्स खूप चांगले आहेत. कंपनीवरिल कर्जही खूप कमी आहे. ही कंपनी गॅस लॉजिस्टिक्समध्येही आहे शिवाय देशात एलपीजीचा वापर सातत्याने वाढत आहे. या दृष्टीनेही येत्या काळात फायदा होण्याची अपेक्षा आहे. एजिस लॉजिस्टिक्समध्ये FII आणि DII ची सुमारे 16.50 टक्के भागीदारी आहे.

एजिस लॉजिस्टीक (Aegis Logistics)

सीएमपी (CMP) - 216.95 रुपये

टारगेट (Target) - 230 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 205 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT