GST Sakal
अर्थविश्व

गतवर्षीच्या तुलनेत जीएसटीत ऑगस्टमध्ये ३० टक्के वाढ

जीएसटी वसुलीच्या वाढत्या आकड्यांनी सरकारला दिलासा दिला आहे. ऑगस्ट महिन्यात १.१२ कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जीएसटी वसुलीच्या (GST Recovery) वाढत्या आकड्यांनी सरकारला (Government) दिलासा दिला आहे. ऑगस्ट महिन्यात १.१२ कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली आहे. ही रक्कम मागील वर्षी झालेल्या जीएसटी वसुलीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के वाढीव असून महाराष्ट्रातून १५,१७५ कोटी रुपये जीएसटी वसुली झाली आहे.

केंद्र सरकारने वसूल केलेल्या १,१२,०२० कोटी रुपयांमध्ये केंद्रीय जीएसटीचा वाटा २०,५२२ कोटी रुपये, तर आंतरराज्य मालवाहतुकीवर आकारल्या जाणाऱ्या आयजीएसटीचा हिस्सा ५६,२४७ कोटी रुपयांचा आहे. या रकमेमध्ये आयात मालावरील करापोटी २६,८८४ कोटी रुपयांचा समावेश आहे. तसेच ८,६४६ कोटी रुपये अधिभारही जमा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आयात सेवांसोबतच देशांतर्गत आर्थिक व्यवहारामधून जमा झालेली रक्कम मागील वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत २७ टक्के अधिक आहे.

मागील सलग नऊ महिने जीएसटी वसुली एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असली तरी कोरोना आणि लॉकडाउनमुळे जूनमध्ये जीएसटी एक लाख कोटीच्या खाली घसरला होता. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये जीएसटी वसुलीने पुन्हा लाखाचा आकडा ओलांडल्याने अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसू लागली आहे. गेल्यावर्षी जून महिन्यांत जीएसटी वसुलीत घसरण नोंदली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT