3i Infotech  esakal
अर्थविश्व

अबब! 'या' मल्टीबॅगर पेनी स्टॉकचा 3 महिन्यांत 1200 टक्के परतावा

एक साधा 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला शेअर गुंतवणुकदारांना मालामाल करु शकतो.

शिल्पा गुजर

शेअर बाजारात कायमच नवनव्या गोष्टी बघायला मिळतात. एक साधा 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला शेअर गुंतवणुकदारांना मालामाल करु शकतो. असेच काहीसे या शेअरसोबत झाले आहे. अवघ्या 3 महिन्यांत या शेअरने त्याच्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करुन दिली.

2021 हे वर्ष शेअर बाजारासाठी शानदार राहिले. या वर्षी असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या वर्षी भारतीय निर्देशांकाने नवीन उच्चांक गाठला. या तेजीत अनेक शेअर्सने गुंतवणुकदारांना मालामाल केले. मल्टीबॅगर पेनी स्टॉकमधील असाच एक स्टॉक म्हणजे 3i इन्फोटेक, ज्याने अवघ्या 3 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदाकांना 1200 टक्क्यांचा रग्गड परतावा दिला आहे.

3i इन्फोटेकच्या शेअरच्या किमतीचा इतिहास पाहता, तो गेल्या आठवड्यात 21.50 टक्क्यांनी वधारला आहे आणि NSE वरील गेल्या सर्व 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये 5 टक्क्यांच्या अपरसर्किटवर पोहोचला आहे. गेल्या 1 महिन्यात हा पेनी स्टॉक 35.85 रुपयांवरून 108.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात 200 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 3 महिन्यांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 8.45 रुपये प्रति शेअरवरून 108.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत स्टॉक सुमारे 1200 टक्क्यांनी वा़ढला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 1 आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज हे 1 लाख रुपये 1.21 लाख झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 3 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते गुंतवले असते तर आज त्याला 13 लाख रुपये मिळाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT