money 
अर्थविश्व

खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत महागाई भत्ता

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- अर्थ मंत्रालयाने मंगळवारी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना आनंदाची बातमी दिली. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता  Dearness Allowance (DA) आणि पेन्शन धारकांसाठीची महागाई मदतीचे Dearness Relief (DR) थकीत असलेले तीन हफ्ते जूले 2021 पासून दिले जाणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लिखित स्वरुपात राज्यसभेत याची माहिती दिली. थकीत असलेले DA आणि DR चे 3  हफ्ते सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जूलै 2021 पासून सुधारित दरानुसार पुन्हा दिले जातील. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR चे हफ्ते गोठवण्यात आले होते. अखेर सरकारने तो पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

2020 च्या सुरुवातीपासून देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शन धारकांची महागाई मदत हफ्ते थांबवण्यात आले होते. ही रक्कम गोठवल्यामुळे सरकारच्या तिजोरीत मोठा पैसा जमा झाला. या काळात सरकारच्या तिजोरीत 37 हजार कोटी रुपये जमा झाले. या पैशांची मदत कोरोनाविरोधातील लढाईत झाली. सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांचे 1.1.2020, 1.7.2020 आणि 1.1.2021 या काळातील महागाई भत्ता आणि महागाई मदत हफ्ते गोठवण्यात आले होते, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिली. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 17 टक्के आहे, तो जूले 2021 पासून 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सरकारने जानेवारी 2021 पासून 21 टक्के महागाई भत्ता देण्याचे जाहीर केले होते. पण, कोरोना महामारीच्या संसर्गामुळे याला स्थगिती देण्यात आली होती. याचा थेट परिणाम 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 61 लाख पेन्शन धारकांवर पडला होता. 

कोरोना महामारीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शन धारकांची महागाई मदत 1 जानेवारी 2020 पासून वाढवण्यात येणार नाही. 1 जूले 2020 आणि 1 जानवारी 2021 मधील DA आणि DR  चे वाढीव हफ्ते देखील देण्यात येणार नाहीत, असं अर्थमंत्र्यांनी मागील वर्षी एका निवेदनात वाढीवर तात्पुरती स्थगिती देताना म्हटलं होतं.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

Pune Garbage News: घनकचरा विभागातील ‘क्रीम पोस्टिंग’ला लगाम? पुणे महापालिकेत एका ठेकेदाराला ५०० टनांपेक्षा जास्त क्षमतेचे कचरा प्रकल्प न देण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT