7th Pay Commission google
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता ! इतका वाढणार डीए

या वाढीनंतर पगारात बंपर वाढ होणार आहे. केंद्र सरकारने अद्याप अधिकृतपणे डीए वाढवण्याची तारीख जाहीर केलेली नाही.

नमिता धुरी

मुंबई : यावेळी सप्टेंबर महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मोदी सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपवणार आहे, ज्याबद्दल लोकांमध्ये आतापासूनच उत्साह पाहायला मिळत आहे.

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए वाढवण्याची घोषणा करणार आहे. 28 पर्यंत सरकार ही मोठी घोषणा करू शकते असे मानले जात आहे. यावेळी सरकार डीए 4 टक्क्यांनी वाढवणार आहे, जे वाढून 38 टक्के होईल. सध्या ३४% डीए उपलब्ध आहे.

या वाढीनंतर पगारात बंपर वाढ होणार आहे. केंद्र सरकारने अद्याप अधिकृतपणे डीए वाढवण्याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु सर्व मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

DA इतका वाढेल

सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPI निर्देशांकाशी जोडलेला आहे. आतापर्यंत आलेल्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते की, महागाई भत्त्यात मोठी वाढ नोंदवली जाऊ शकते. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याचा समावेश केला जाऊ शकतो.

DA किती वाढणार हे जाणून घ्या

महागाईची गणना करणार्‍या तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरमध्ये 4% DA वाढीवर शिक्कामोर्तब होईल असे मानले जाते. जूनमधील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक-IW चा आकडा 129.2 वर होता. त्यामुळे महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ निश्चित आहे. तज्ज्ञांच्या मते, जून महिन्यातील महागाई भत्त्याचा आकडा 130 वर पोहोचला तर महागाई भत्त्याबाबत संभ्रम वाढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT