Gautam Adani
Gautam Adani  Sakal
अर्थविश्व

Adani Group : बँकांचे 80,000 कोटी रुपये बुडणार? अदानी ग्रुपला सर्वात जास्त कर्ज देणाऱ्या SBI चे मोठे वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

Adani Group : अमेरिकन रिसर्च कंपनी फर्म हिंडेनबर्ग रिपोर्टच्या अहवालाने खळबळ उडाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण सुरू आहे. गौतम अदानी यांची संपत्ती 22 अब्ज डॉलरवर घसरली आहे. त्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या खाली गेली आहे.

अदानी समूहाच्या समभागांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचबरोबर कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकाही त्यावर लक्ष ठेवून आहेत. अदानी समूहांवर 80 हजार कोटींचे बँक कर्ज आहे.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची सध्या चिंता नसल्याचे म्हटले आहे.

स्टेट बँकेचे कॉर्पोरेट बँकिंग एमडी स्वामीनाथन म्हणाले की, सध्या अशी कोणतीही परिस्थिती नाही ज्यामुळे आम्हाला अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची चिंता करावी लागेल. त्यांना दिलेले कर्ज रिझर्व्ह बँकेच्या हद्दीत आहे. ते कर्ज सुरक्षित करण्यासाठी सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले आहे.

अदानी समूहाकडे भारतीय बँकांचे सुमारे 80,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे, जे समूहाच्या एकूण कर्जाच्या 38 टक्के आहे.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

एसबीआयचे चेअरमन दिनेश कुमार म्हणाले की, अदानी समूहाने अलिकडच्या काळात एसबीआयकडून कोणताही निधी घेतला नाही. अदानी समूहाने एसबीआयकडून कोणत्याही प्रकारच्या निधीसाठी विनंती केल्यास त्याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात अनेक अडचणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात अदानी समूहाला ८८ प्रश्न विचारले आहेत. या अहवालात अदानी समूहाला विचारण्यात आले आहे की, गौतम अदानी यांचे धाकटे बंधू राजेश अदानी यांना समूहाचे एमडी का करण्यात आले आहे, तर त्यांच्यावर कस्टम करचोरी, बनावट आयात दस्तऐवज आणि अवैध कोळसा आयात केल्याचा आरोप आहे.

हिरे व्यापार घोटाळ्यात नाव आल्यानंतरही गौतम अदानी यांचे मेहुणे समिरो व्होरा यांना अदानी ऑस्ट्रेलिया विभागाचे कार्यकारी संचालक का करण्यात आले, असे अनेक प्रश्न हिंडनबर्ग रिसर्च एजन्सीने अदानी समूहाला विचारले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT