अर्थविश्व

बांधकाम क्षेत्रातील 'हा' स्टॉक देईल मजबूत परतावा!

शिल्पा गुजर

Stock to Buy: शेअर बाजार हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे गुंतवून प्रचंड परतावा मिळवू शकता. पण शेअर बाजारात चुकीचे शेअर्स निवडले तर हा पैसा बुडूही शकतो. त्यामुळेच तुम्ही शेअर मार्केटमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊयात. संदीप जैन यांनी कॅश मार्केटमधील एका स्टॉकमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कोणता आहे हा स्टॉक पाहूयात...

संदीप जैन यांनी निवडलेला स्टॉक
शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी अॅक्शन कन्स्ट्रक्शनमध्ये (Action Construction) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

अॅक्शन कन्स्ट्रक्शन का ?
अॅक्शन कन्स्ट्रक्शन ही देशातील आघाडीची कंपनी आहे, जी मोबाईल आणि टॉवर क्रेन बनवण्याचे काम करते. सध्या बांधकामाला वेग आला आहे, त्यामुळे बांधकाम उपकरणे असलेल्या कंपन्यांना चांगला वेग येईल असे त्यांचे म्हणणे आहे.

अॅक्शन कन्स्ट्रक्शन (Action Construction)
सीएमपी (CMP) - 238.10 रुपये
टारगेट (Target) - 270 रुपये
कालावधी (Duration) - 6-9 महीने

- कंपनी काय करते?
ही कंपनी 1995 पासून कार्यरत आहे. याशिवाय या कंपनीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. कंपनीचे फंडामेंटल्स उत्कृष्ट आहेत. या कंपनीचे काही प्लांट फरीदाबादमध्ये आहेत, जिथे त्यांची क्षमता 12,000 बांधकाम उपकरणांची आहे.

- कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत ?
कंपनीची फंडामेंटल्स अतिशय भक्कम आहेत. ही कंपनी 16% च्या इक्विटी ऑन रिटर्नवर काम करते. या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. याशिवाय कंपनीने सप्टेंबर तिमाहीतही चांगले निकाल दिले आहेत. कंपनीला गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत 15 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 21 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

काय? १६७.२ कोटींना विकलं गेलं ‘यशोदा-श्रीकृष्ण’ चित्र, यात नक्की विशेष काय? Viral

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

Sonu Nigam Concert : पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच; सोनू निगम लाईव्ह कॉन्सर्ट, १० मे

SCROLL FOR NEXT