Gautam Adani News esakal
अर्थविश्व

Adani : विल्मरनंतर अदानींच्या आणखी एका कंपनीचा IPO धडकणार

अदानी समूहाच्या 8 कंपन्या बाजारात सूचीबद्ध आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Adani Capital IPO Update : अदानी समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात येण्याच्या तयारीत असून, लवकरच अदानी कॅपिटलचा IPO बाजारात येण्याची शक्यता आहे. गौतम अदानी अदानी कॅपिटल आयपीओद्वारे 1500 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. असे मानले जाते की, कंपनी 2024 च्या सुरुवातीला IPO लाँच करून स्टॉक एक्स्चेंजवर कंपनीला सूचीबद्ध करू शकते.

अदानी कॅपिटल ही एक NBFC

अदानी कॅपिटल ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. जे 10 टक्के स्टेक विकण्याचा विचार करत आहे. यासह, आयपीओद्वारे 2 बिलियन डॉलरचे मूल्यांकन करण्याचे लक्ष्य आहे. तसेच अदानी कॅपिटलला 30,000 ते 30 लाखांपर्यंतच्या कर्ज वाटपासाठी बाजारपेठ काबीज करण्याची इच्छा आहे. अदानी कॅपिटलची सुरुवात 2017 मध्ये झाली असून, 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या 2020-21 आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न 16.3 कोटी रुपये इतके होते.

कंपनीच्या 8 राज्यांमध्ये 154 शाखा असून, कंपनीकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्या सुमारे 60,000 आहे. अदानी कॅपिटल कृषी उपकरणे, व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी कर्ज प्रदान करते. अदानी समूहाच्या 8 कंपन्या बाजारात सूचीबद्ध आहेत. ज्यामध्ये अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स, अदानी विल्मर आणि अदानी एंटरप्रायझेस आदींचा समावेश आहे. या कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्यानंतर आता गुंतवणूकदार अदानी कॅपिटलच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT