Adani-Group
Adani-Group sakal media
अर्थविश्व

अदानी ग्रुपच्या या शेअरने 3 वर्षात 1 लाखाचे केले 61 लाख...

शिल्पा गुजर

अदानी समूहाचे शेअर्स त्यांच्या बंपर कमाईमुळे चर्चेत आहेत. यातच अदानी ग्रीन एनर्जीच्या (Adani Green Energy) शेअरने त्याच्या गुंतवणुकारांना तगडा परतावा दिला आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स गेल्या 3 वर्षांत 37.40 रुपयांवरून 2279 रुपयांपर्यंत वाढलेत. त्याने 3 वर्षांच्या कालावधीत 6,000 टक्के परतावा दिला आहे.
अदानी ग्रुपचा हा शेअर गेल्या 1 महिन्यापासून कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहे. गेल्या 1 महिन्यात हा शेअर सुमारे 2800 रुपयांवरून 2279 रुपयांपर्यंत घसरला आहे अर्थात 20 टक्क्यांनी घसरला आहे. पण 2022 चा विचार केल्यास या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे. 2022 मध्ये हा स्टॉक 1347 रुपयांवरून 2279 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत सुमारे 70 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकने 70 टक्के कमाई केली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी 17 मे 2019 रोजी NSE वर 37.40 रुपयांवर होती. त्याच वेळी, तो सध्या 2279 रुपयांवर दिसत आहे. म्हणजेच या शेअरने या 3 वर्षांत 61 वेळा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

1 लाखाचे 61 लाख-
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2022 च्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याला 1.70 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी अदानी ग्रीन एनर्जीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 1.75 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 61 लाख रुपये मिळाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT