Adani Group  sakal
अर्थविश्व

Adani Group Row : गौतम अदानींना सेबीचा झटका! सेबीचे अधिकारी म्हणाले, लवकरच कारवाई...

सेबीने अदानी समूहाबाबत मौन सोडले असून अनेक बाबींवर आपले म्हणणे मांडले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adani Group Row News : हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समुहामध्ये खळबळ उडाली आहे. कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यासोबतच अदानी समूहाचे बाजारमूल्यही यानंतर जवळपास निम्म्याने घसरले आहे.

गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. अदानी समूहाने कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओही रद्द केला होता. दरम्यान, सेबीने अदानी समूहाबाबत मौन सोडले असून अनेक बाबींवर आपले म्हणणे मांडले आहे.

अदानी समूहावर सेबीच उत्तर :

अदानी समूहाच्या बाबतीत बोलताना, बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने म्हटले आहे की, बाजारात निष्पक्षता, कार्यक्षमता आणि मजबूत मूलभूत तत्त्वे राखण्यासाठी वचनबद्ध आहे.

स्टॉक मार्केट सुरळीत, पारदर्शक, कार्यक्षमतेने चालेल याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, जसे ते आतापर्यंत चालत आले आहे.

शेअर मार्केटबाबत मोठे विधान :

गेल्या आठवडाभरापासून अदानीच्या शेअर्समध्ये बरीच उलथापालथ सुरू आहे. यावर सेबीने सांगितले की, गेल्या आठवड्यात अदानी समूहाच्या समभागांच्या किमतीत असामान्य चढ-उतार दिसून आले.

बाजाराच्या सुरळीत आणि कार्यक्षम कामकाजासाठी विशिष्ट समभागांमध्ये अत्यंत अस्थिरतेला सामोरे जाण्यासाठी सर्व देखरेख व्यवस्था आहेत.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

अदानी ग्रुप होणार कारवाई? :

अदानीच्या शेअर्सच्या घसरणीवर, सेबीने सांगितले की सर्व विशिष्ट प्रकरणे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर, सेबी त्यांची तपासणी करते आणि योग्य कारवाई करते.

हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समूहावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT