Adani Group sakal
अर्थविश्व

Adani Group : हिंडेनबर्गचा अहवालाचा अदानींना फटका! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

सलग दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात आज सकाळी अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या घसरणीसह उघडले.

सकाळ डिजिटल टीम

Adani Group Stocks Crash : सलग दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात आज सकाळी अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या घसरणीसह उघडले. बाजार उघडताच अदानी समूहाचे शेअर्स 19 टक्क्यांनी घसरले.

यूएसस्थित हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या शेअर्सची हेराफेरी केल्याने तसेच शेअर्सच्या मूल्यांकनापासून कॉर्पोरेट गव्हर्नन्सपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग सलग दुसऱ्या दिवशीही घसरले आहेत.

शेअर्स 19 टक्क्यांनी घसरले :

अदानी ट्रान्समिशनचा स्टॉक उघडताच 19 टक्क्यांनी घसरला. बुधवारी शेअर 2517 रुपयांवर बंद झाला होता, जो बाजार उघडल्यानंतर 482 रुपयांपर्यंत खाली घसरला. सध्या हा शेअर 13.22 टक्क्यांच्या घसरणीसह 2177 रुपयांवर व्यवहार करत आहे.

अदानी टोटल गॅसच्या स्टॉकमध्येही मोठी घट झाली आहे. शेअर 3660 रुपयांच्या शेवटच्या बंदवरून 700 रुपयांपर्यंत म्हणजे 19 टक्क्यांनी घसरून 2963 रुपयांवर आला.

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 1857 रुपयांच्या आधीच्या बंद पातळीवरून 1564 रुपयांवर 15.77 टक्क्यांनी म्हणजे 293 रुपये प्रति शेअर घसरला. सध्या हा शेअर 7.74 टक्क्यांच्या घसरणीसह 1714 रुपयांवर व्यवहार करत आहे.

'या' शेअर्समध्ये लोअर सर्किट :

अदानी समूहाच्या इतर समभागांमध्ये अदानी पॉवर आणि अदानी विल्मार हेही 5 टक्क्यांनी घसरले असून दोन्ही समभाग लोअर सर्किटमध्ये आहेत.

बुधवारी 713 रुपयांवर बंद झालेला अदानी पोर्ट्सचा शेअर उघडताच 675 रुपयांपर्यंत घसरला, सध्या हा शेअर 2.63 टक्क्यांनी घसरून 695 रुपयांवर व्यवहार करत आहे.

अदानी समूहाचे इतर समभाग NDTV 5 टक्के, अंबुजा सिमेंट 7.63 टक्के आणि ACC 6.09 टक्क्यांनी घसरले आहेत.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

FPO च्या दिवशी मोठी घसरण :

अदानी एंटरप्रायझेसची फॉलो-ऑन ऑफर शुक्रवारपासून सुरू आहे. त्याच दिवशी स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली आहे. 3388 च्या शेवटच्या बंद पातळीपासून, स्टॉक 6.13 टक्क्यांनी घसरून 3180 रुपयांच्या पातळीवर आला आहे.

सध्या हा शेअर 2.25 टक्क्यांच्या घसरणीसह 3312 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत आता एफपीओच्या प्राइस बँडच्या पातळीच्या जवळ आहे.

हिंडेनबर्ग अहवालावर काय आहे :

अदानी समूहाने गुरुवारी सांगितले की, अमेरिकन कंपनी हिंडनबर्ग रिसर्चविरुद्ध कायदेशीर कारवाईचे पर्याय शोधत आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चने सांगितले की, ते त्यांच्या अहवालावर ठाम आहे. हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडमध्ये गुंतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : कल्याणमधील कमलादेवी कॉलेजच्या विरोधात आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT