Saregama India 
अर्थविश्व

डिमर्जरच्या घोषणेनंतर Saregama Indiaच्या स्टॉकने हीट केलं अप्पर सर्किट!

शिल्पा गुजर

सारेगामा इंडियाच्या शेअर्समध्ये (Saregama India) बीएसईवर 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट 4,828 रुपयांवर दिसून आले. आता कंपनी आपला संपूर्ण वितरण व्यवसाय डिमर्ज करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. यानंतरच शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. या डिमर्जर अंतर्गत, डिजिटल मार्केटप्लेसवरील कारवानसह (Carvaan on digital marketplaces) कंपनीची सर्व फिजिकल प्रॉडक्ट्स तसेच कंपनीचे नॉन-कोअर ऍसेट डीमर्ज केली जाईल.

या डिमर्जरमध्ये कोणताही रोख व्यवहार होणार नाही आणि डिमर्जरअंतर्गत सारेगामाच्या विद्यमान भागधारकांना डीमर्जर कंपनीच्या (Digidrive Distributors Ltd) प्रत्येकी 1 शेअरच्या प्रति 10 रुपये फेस व्हॅल्युचे 2 पूर्ण पेड-अप शेअर्स मिळतील.

या डिमर्जर प्लॅनमध्ये फक्त कंपनीची डिजिटल वितरण शाखा वेगळी केली जाईल. कारवानचा व्यवसाय पूर्वीप्रमाणे सारेगामाकडेच राहील, असे आयसीआयसीआय सिक्युरिटीने या डिमर्जर प्लॅनवर म्हटले आहे.

गेल्या 5 वर्षात सारेगामाचे शेअर्स 18.7 पटीने वाढले आहेत. या स्टॉकमध्ये त्याचे होल्ड रेटिंग कायम ठेवताना, ICICI सिक्युरिटीने त्यासाठी 4890 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. विशेष म्हणजे सारेगामाच्या शेअर्समध्ये एका वर्षाच्या कालावधीत 202 टक्के वाढ झाली आहे. पण, 2022 मध्ये तो आतापर्यंत 11 टक्क्यांनी कमी आहे.

गुरुवारी दुपारी सारेगामाचा शेअर NSE वर सुमारे 230 रुपये अर्थात 5 टक्के वाढीसह 4827.25 रुपयांवर अप्पर सर्किटमध्ये लॉक झाला. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,505.85 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 1,513.95 रुपये आहे. या शेअरचे व्हॉल्यूम 6,600 आहे आणि मार्केट कॅप 9,316 कोटी रुपये आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT