IPO Sakal media
अर्थविश्व

AGS Transact IPO आजपासून खुला; गुंतवणूक करावी की नाही? जाणून घ्या

पेमेंट सोल्यूशन प्रोवायडर कंपनी AGS Transact Technologies चा आयपीओ (IPO) आजपासून सुरू झाला आहे.

शिल्पा गुजर

AGS Transact Technologies Opens: पेमेंट सोल्यूशन प्रोवायडर कंपनी AGS Transact Technologies चा आयपीओ (IPO) आजपासून सुरू झाला आहे. रिटेल गुंतवणूकदार 24 जानेवारीपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. 2022 चा हा पहिला आयपीओ (IPO) आहे. या आयपीओमधून(IPO) 680 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.

पॉझिटीव्ह / निगेटीव्ह पॉईंट्स-

मार्केट एक्सपर्ट अनिल सिंघवी यांनी आयपीओपासून (IPO) दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आयपीओवर (IPO) Nota/Avoid चा सल्ला दिला आहे. कॅश मॅनेजमेंट आणि एटीएम सेवांमध्ये ही दुसरी सर्वात मोठी कंपनी असल्याचे अनिल सिंघवी म्हणाले आणि हीच कंपनीसाठी पॉझिटिव्ह बाब आहे. पण, कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. चालू वर्षातही कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. रोख रक्कम असूनही कंपनीवर कर्ज जास्त आहे. पगार, जीएसटी आणि काही कर्जदारांचे पैसे देण्यासही उशीर झाला आहे. अशा परिस्थितीत IPO पासून दूर राहणेच चांगले ठरेल असा सल्ला सिंघवींनी दिला आहे.

AGS Transact Technologies IPO मध्ये 680 कोटी शेअर जारी करण्यात आले. हे सर्व शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये दिलेले आहेत. याद्वारे कंपनीचे प्रमोटर रवी बी गोयल यांच्यासह विद्यमान भागधारक त्यांचे स्टेक विकतील. इश्यूनंतर, कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी सुमारे 32 टक्क्यांनी कमी होईल, तर पब्लिश शेअरहोल्डिंग सध्याच्या 1.1 टक्क्यांवरून 33.26 टक्क्यांपर्यंत वाढेल.

प्राइस बँड आणि लॉट साइज-

AGS Transact Technologies ने त्यांच्या IPO साठी 166-175 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. त्याच वेळी, यामध्ये लॉट साइझ 85 शेअर्स असेल. किमान एका लॉटसाठी बोली लावणे आवश्यक आहे. 175 रुपयांवरील प्राइस बँडच्या बाबतीत, किमान 14,875 रुपये आयपीओमध्ये (IPO) ठेवावे लागतील. यानंतर, 85 शेअर्सच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते.

किती राखीव जागा ?

आयपीओअंतर्गत (IPO), 50 टक्के इक्विटी पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (Qualified Institutional Buyers) राखीव ठेवण्यात आली आहे. 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) राखीव आहेत. तर 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Buyers) राखीव आहेत.

कंपनी काय करते ?

AGS Transact Technologies ची स्थापना डिसेंबर 2002 मध्ये करण्यात आली. कंपनी सध्या बँका आणि कॉर्पोरेट ग्राहकांना डिजिटल आणि रोख-आधारित सोल्यूशन्स देणारी देशातील सर्वात मोठी पेमेंट सोल्यूशन प्रोव्हाडर्सपैकी एक आहे. ही कंपनी पेमेंट सोल्यूशन्स, बँकिंग ऑटोमेशन सोल्यूशन्स आणि इतर ऑटोमेशन सोल्यूशन्स देते. त्याच्या ग्राहकांमध्ये रिटेल, पेट्रोलियम आणि कलर सेक्टरमधील ग्राहकांचा समावेश आहे. कंपनीने श्रीलंका, सिंगापूर, कंबोडिया, फिलीपिन्स आणि इंडोनेशिया सारख्या इतर आशियाई देशांमध्येही आपला व्यवसाय विस्तारित केला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT