Ratan Tata Sakal
अर्थविश्व

Air India : प्रजासत्ताक दिनी टाटांची भन्नाट ऑफर, कमी किंमतीत मिळणार विमान तिकिटे; असे आहेत तिकीट दर

ऑफरमध्ये देशांतर्गत फ्लाइटची तिकिटे कंपनीकडून कमी किमतीत लोकांना दिली जातील.

सकाळ डिजिटल टीम

Air India Flight Ticket : काही दिवसात, देश प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्सही देतात. यानिमित्ताने एअर इंडियाने एक ऑफरही सादर केली असून कमी किमतीत विमान तिकीट देऊ केले आहे.

74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, एअर इंडियाने देशांतर्गत नेटवर्कवर त्यांच्या फ्लाइट तिकिटांवर ऑफर सुरू केल्या आहेत.

सादर केलेली ही ऑफर 23 जानेवारीपर्यंत वैध असेल. अशा परिस्थितीत, या ऑफर अंतर्गत, 23 जानेवारीपर्यंत तिकीट बुक करता येईल आणि कमी किमतीत प्रवास करता येईल.

या ऑफर अंतर्गत तिकिटे एअरलाइनच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंटसह सर्व एअर इंडिया बुकिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. या ऑफरमध्ये देशांतर्गत फ्लाइटची तिकिटे कंपनीकडून कमी किमतीत लोकांना दिली जातील.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, ही सवलतीची तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये उपलब्ध असतील आणि 1 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत भारतातील देशांतर्गत नेटवर्कवरील प्रवासासाठी लागू होतील.

कंपनीने सांगितले की, किंमत 1705 रुपयांपेक्षा कमी वन-वे भाड्यापासून सुरू होईल आणि लोकांना या ऑफर अंतर्गत 49 हून अधिक देशांतर्गत प्रवासांवर सूट मिळेल.

एअर इंडियाने दिलेल्या ऑफरमधील तिकीट भाडे :

  • दिल्ली ते मुंबई - रु 5,075

  • चेन्नई ते दिल्ली - रु 5,895

  • बंगलोर ते मुंबई - रु. 2,319

  • दिल्ली ते उदयपूर - रु. 3,680

  • दिल्ली ते गोवा - रु 5,656

  • दिल्ली ते पोर्ट ब्लेअर - रु 8,690

  • दिल्ली ते श्रीनगर - रु. 3,730

  • अहमदाबाद ते मुंबई - रु. 1,806

  • गोवा ते मुंबई - रु. 2,830

  • दिमापूर ते गुवाहाटी - रु. 1,783

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT