Investment based on specific circumstances sakal
अर्थविश्व

स्मार्ट गुंतवणूक : विशिष्ट परिस्थितीवर आधारित गुंतवणूक

रशिया-युक्रेन युद्ध हे भांडवली बाजारातील पडझडीचे सध्याचे मुख्य कारण ठरले

सकाळ वृत्तसेवा

जे गुंतवणूकदार कोविड-१९ मध्ये भांडवली बाजारात उतरले होते, त्यांनी मोठी घसरण अनुभवली. २०२० पासून त्यांना त्यांच्या गुंतवणूक प्रवासात एकामागून एक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. रशिया-युक्रेन युद्ध हे भांडवली बाजारातील पडझडीचे सध्याचे मुख्य कारण ठरले आहे. या युद्धाने बाजार जवळपास १० टक्क्यांनी कोसळला आहे. याच वेळी निर्माण झालेली परिस्थिती काही निवडक कमोडिटीसाठी; जसे की क्रूड ऑइल, निकेल यासारख्या धातूंमध्ये तेजीसाठी कारणीभूत ठरली.  

काही महिने मागे वळून पाहिले, तर वाहन उद्योग हा सेमी कंडक्टरच्या तुटवड्यामुळे प्रचंड दबावाखाली होता. मात्र, जेव्हा कोविड-१९ ची महासाथ पसरली, त्यापूर्वी वाहन उद्योग तेजीत होता. स्थावर मालमत्ता क्षेत्र मंदीत होते आणि त्याचे प्रतिबिंब स्थावर मालमत्ता शेअरवर उमटले. ही सर्व काही मोजकी उदाहरणे आहेत, ज्यात परिस्थिती बदलल्यानंतर काही विशिष्ट क्षेत्रांवर झपाट्याने सकारात्मक किंवा नकारात्मक परिमाण कसे होतात, ते दर्शवतात. यातून असे दिसून येते, की अशा विशिष्ट परिस्थितीचा फायदा घ्यायला हवा. दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर तुम्हाला अशा परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी भविष्यातील गुंतवणूकसंधी योग्य वेळीच निवडणे आवश्यक आहे. याचा सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक संधी शोधण्याची प्रक्रिया एका कुशल फंड व्यवस्थापकाकडे सोपवणे, जो तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी शोधू शकेल.

विशिष्ट परिस्थितीतील गुंतवणूक

विशिष्ट परिस्थिती म्हणजे जी एखाद्या घटनेमुळे तयार झाली आहे, जसे की भू-राजकीय संघर्ष, सामाजिक आणि आर्थिक घटना, कंपन्यांची फेररचना, सरकारी धोरणे किंवा नियामकाच्या सुधारणा किंवा एखाद्या कंपनीत निर्माण झालेली तात्पुरती आव्हाने किंवा एखाद्या क्षेत्रातील आव्हाने ही अशी विशिष्ट परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. मूलतः अशा योजनांचा फंड व्यवस्थापक हा ३६० अंशांचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूकसंधी शोधत असतो, जिथे त्याला चांगल्या कंपनीचे शेअर वाजवी किंवा कमी किंमतीत खरेदी करता येतील. ही तात्पुरती कमी झालेली किंमत वरील गुंतवणूकसंधीला अधोरेखित करते. यातून असेही दिसून येते, की जरी ओपन एंडेड इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक केली असली, तरी पोर्टफोलिओची भक्कम बांधणी होते. याच वेळी हे फंड पोर्टफोलिओत वैविध्य ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

गुंतवणूक कशी करावी?

अशा फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी संबधित फंड मॅनेजरच्या पूर्वकामगिरीचा आढावा घेणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांतील त्याचे यशस्वी डावपेच आणि कामगिरी त्या फंड योजनेचे यश दाखवतात. यातून फंड व्यवस्थापक गुंतवणूकसंधी कशी हेरतो, याची एक सुस्पष्ट कल्पना दिसून येते. या श्रेणीतील गुंतवणूक पर्याय पाहिले, तर यात इंडियन अपॉर्च्युनिटीज फंड हा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाची योजना या सर्व बाबी पूर्ण करताना दिसते.

- अजय लढ्ढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT