Shares File Photo
अर्थविश्व

Amrutanjan शेअर घेण्याची हीच योग्य वेळ; तज्ञांचा सल्ला

या शेअरमध्ये शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात.

शिल्पा गुजर

या शेअरमध्ये शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात.

शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात लाल चिन्हा ने झाली. मजबूत जागतिक संकेत असूनही, शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आणि सेन्सेक्स (Sensex) 800 अंकांनी घसरला. इतकेच नाही तर निफ्टी (Nifty) 16500 च्या खाली व्यवहार करत आहे. दरम्यान, जर गुंतवणूकदारांना मजबूत स्टॉक खरेदी करायचा असेल तर शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी कॅश मार्केटमधून अमृतांजनची (Amrutanjan) निवड केली आहे. या शेअरमध्ये शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. यातून चांगला परतावा मिळेल, असा विश्वास संदीप जैन यांनी व्यक्त केला आहे.

अमृतांजन (Amrutanjan)

- सीएमपी (CMP) - 817.40 रुपये

- टारगेट (Target) - 930 रुपये

अमृतांजनमध्ये (Amrutanjan) खरेदीचा सल्ला

अमृतांजन (Amrutanjan) याआधी सिंगल डिजिटमध्ये पैसे कमवत होती, पण आता ती डबल डिजिटमध्ये कमाई करू लागली आहे. सप्टेंबर 2020 पासून कंपनीने स्थिर वाढ नोंदवली आहे. कंपनी अनेक वर्ष जुनी आहे. अमृतांजन (Amrutanjan) गेल्या 130 वर्षांपासून कार्यरत आहे. ही कंपनी सॅनिटरी नॅपकिन्स, ज्युसरच्या व्यवसायातही कार्यरत आहे.

कंपनीचे फंडामेंटल्स ?

बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांच्या मते कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय भक्कम आहेत. डिविडेंड यील्ड रेश्योही चांगला आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. सध्या हा शेअर 20 टक्क्यांनी घसरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे यात खरेदी करण्याची ही योग्य वेळ असल्याचे जैन यांचे म्हणणे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT