Anirudh Rathi writes about Income Tax Returns
Anirudh Rathi writes about Income Tax Returns Sakal
अर्थविश्व

आता लगबग ‘इन्कम टॅक्स रिटर्न्स’ची!

अनिरुद्ध राठी

प्रा प्तिकर विभागाने विविध प्रकारचे सात फॉर्म, जसे की आयटीआर-१, आयटीआर-२ ते आयटीआर-७ अधिसूचित केलेले आहेत. त्यापैकी आयटीआर-१ ते आयटीआर-४ हे व्यक्तिगत करदात्याला लागू

जुलै महिन्याचा आता शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न्स) दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ असून, आता काहीच दिवस आपल्या हातात शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने या विवरणपत्राबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकूया.

प्रा प्तिकर विभागाने विविध प्रकारचे सात फॉर्म, जसे की आयटीआर-१, आयटीआर-२ ते आयटीआर-७ अधिसूचित केलेले आहेत. त्यापैकी आयटीआर-१ ते आयटीआर-४ हे व्यक्तिगत करदात्याला लागू आहेत.

पुढील दहा परिस्थितीमध्ये प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य होते-

जर आपले वार्षिक ढोबळ उत्पन्न हे मूळ करपात्र मर्यादेपेक्षा (रु. तीन लाख हे ज्येष्ठ नागरिकांसाठी, रु. पाच लाख हे अतिज्येष्ठ नागरिकांसाठी आणि रु. अडीच लाख अन्य व्यक्ती करदात्यांसाठी) जास्त असल्यास.

  • जर भारताबाहेर काही मालमत्ता असेल, तर याही परिस्थितीत अनिवार्य.

  • एखाद्या आर्थिक वर्षात बँक खात्यात रु. एक कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास.

  • एखाद्या आर्थिक वर्षात जर परदेशी प्रवासासाठी रु. दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यास.

  • विजेचा वापर वार्षिक रु. एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास.

  • उद्योग-धंद्यामधील वार्षिक उलाढाल जर ६० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास.

  • व्यवसायात (प्रोफेशन) वार्षिक रिसीट जर रु. दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास.

  • जर ‘टीडीएस’ रु. २५ हजार किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास.

  • ‘टीसीएस’ जर रु. ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त असल्यासही

  • जर बचत खात्यात रु. ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम एकाच आर्थिक वर्षामध्ये जमा केल्यास.

विवरणपत्र वेळेवर दाखल करण्याचे फायदे

वर नमूद केलेल्या परिस्थितीत विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहेच; परंतु इतर परिस्थितीमध्ये सुद्धा हे विवरणपत्र कसे फायदेशीर ठरू शकते, हे आपण पाहूया.

  • जेव्हा आपण वाहनकर्ज किंवा गृहकर्ज आदी कर्जांसाठी अर्ज करतो, तेव्हा सर्व बँका तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून प्राप्तिकर विवरणपत्र मागतात. त्यामुळे कर्जमंजुरीसाठी हा एक अनिवार्य दस्तावेज आहे.

  • आपण भरलेला आगाऊ कर (ॲडव्हान्स टॅक्स) तसेच ‘टीडीएस’ किंवा ‘टीसीएस’ हे एकूण देय करापेक्षा जास्त असल्यास अशा परिस्थितीत प्राप्तिकर विभागाकडून परतावा अर्थात रिफंडचा दावा करावा लागतो. त्यासाठी विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

  • प्राप्तिकर विवरणपत्र हे तुमच्या उत्पन्नाचा, तसेच पत्त्याचा पुरावा म्हणूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरले जाऊ शकते.

  • व्हिसा अर्जाच्या वेळी मागील काही वर्षांच्या विवरणपत्राच्या प्रती सादर करणे आवश्यक असते.

  • झालेला तोटा पुढे ‘कॅरी फॉरवर्ड’ आणि ‘सेट ऑफ’ करण्यासाठी विवरणपत्र भरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

  • वेळेवर आणि सर्वांत महत्त्वाचे योग्यरित्या, परिपूर्ण प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यास प्राप्तिकर कायद्यानुसार लागणारा दंड आणि विलंब शुल्क निश्चितच टाळता येते.

  • हे सर्व लक्षात घेता, पात्र करदात्यांनी आपले प्राप्तिकर विवरणपत्र अंतिम मुदतीपूर्वी दाखल करणे हितावह आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT