share marketing 
अर्थविश्व

SEBI : अप्रमेय इंजिनिअरिंगचा IPO लवकरच येणार, सेबीकडे कागदपत्र सादर...

कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी लिस्ट करण्याची योजना आहे.

सकाळ डिजिटल टीम

वैद्यकीय उपकरण बनवणारी कंपनी अप्रमेय इंजिनिअरिंगने (Aprameya Engineering) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) आयपीओद्वारे (IPO) पैसे उभारण्यासाठी अर्ज सादर केला आहे. सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, कंपनी आयपीओ अंतर्गत 50 लाख नवीन शेअर्स जारी करेल आणि त्यात कोणतीही ऑफर-फॉर-सेल (OFS) सहभागी होणार नाही असे सेबीने गुरुवारी सांगितले.

आयपीओमधून जमा झालेला पैसा खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि इतर कामांसाठी वापरला जाईल. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी लिस्ट करण्याची योजना आहे. यात हेम सिक्युरिटी लिमिटेड ही एकमेव बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे.

अप्रमेय इंजिनिअरिंग हेल्थकेअरशी संबंधित पायाभूत सुविधांच्या व्यवसायात आहे. यामध्ये हॉस्पिटलमधील आयसीयू (ICU), ऑपरेशन थिएटर्स आणि प्रीफेब्रिकेटेड स्ट्रक्चर वॉर्ड्सची स्थापना, चालू आणि देखभाल यांचा समावेश आहे. याशिवाय, ते रुग्णालयांना हाय-व्हॅल्यू हेल्थकेअर इक्विपमेंट आणि डायग्नोस्टिक इक्विपमेंटही पुरवते.

दरम्यान, नुकत्याच आलेल्या तमिळनाड मर्कंटाइल बँकेच्या आयपीओला शेवटच्या दिवसापर्यंत केवळ 2.86 पट सबस्क्राइब केले गेले. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) राखीव हिस्सा 1.62 वेळा सब्सक्रिप्ट झाला. दुसरीकडे, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 2.94 पट बोली लागली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला हिस्सा 6.48 पट सबस्क्राइब झाला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

इलॉन मस्कने पुन्हा एकदा जगाला केलं शॉक! Wikipedia ला टक्कर देणार Grokipedia, कोणतं आहे बेस्ट? पाहा एका क्लिकवर

"तर आमची मैत्री तुटेल..." राज ठाकरेंसोबत सिनेमा बनवण्यावर महेश मांजरेकरांनी मांडलं मत; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : र्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना खडे बोल

SCROLL FOR NEXT