अर्थविश्व

शेअर बाजारातील पडझड सुरूच

सकाळवृत्तसेवा

मुंबई - इन्फोसिसमधील नाट्यमय घडामोडी आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा कायम ठेवल्याने शेअर बाजारातील पडझड सोमवारी (ता.२१) कायम राहिली. दिवसअखेर सेन्सेक्‍स २६६ अंशांच्या घसरणीसह ३१ हजार २५८.८५ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ८३.०५ अंशांची घसरणीसह ९ हजार ७५४ अंशांवर बंद झाला. 

समभागांच्या पुनर्खरेदीला सुरवात करणाऱ्या इन्फोसिसला शेअरमधील घसरण मात्र थांबवता आली नाही. सीईओ विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर इन्फोसिसच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. आज कंपनीच्या शेअरमध्ये ५.४० टक्‍क्‍याची घट झाली. तो ४९.६० रुपयांच्या घसरणीसह ८७३.५० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. बांधकाम, ऊर्जा निर्मिती, पायाभूत सेवा, वित्त सेवा पुरवठादार आणि बॅंका, दळणवळण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. 

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. बुडीत कर्जांमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणी सापडलेल्या सार्वजनिक बॅंकांच्या शेअर्सची विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले. निफ्टी पीएसयू बॅंकेक्‍स, फार्मा, मेटल आणि आयटी निर्देशांकांत घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी मंचावर इन्फोसिस, आयटीसी, अंबुजा सिमेंट, एचयूएल, भारत पेट्रोलियम,टाटा स्टील, एसबीआय, रिलायन्स, पॉवर ग्रीड, अरबिंदो फार्मा, टाटा मोटर्स आदी शेअर्समध्ये घसरण झाली. ॲक्‍सिस बॅंक, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअर वधारले. 

दोनशे कंपन्यांची नोंदणी रद्द होणार
बाँबे स्टॉक एक्‍सेंज (बीएसई) या आठवड्यात दोनशे कंपन्यांची शेअर बाजारातील नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. याचसोबत या कंपन्यांच्या प्रवर्तकांवरही १० वर्षांसाठीची ट्रेडिंग बंदी घालण्यात येणार आहे. या सर्व कंपन्यांना शेअर बाजाराच्या यादीतून वगळण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : गंगा एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी; आमदारांची गाडी अपघातग्रस्त

SCROLL FOR NEXT