warren-buffett 
अर्थविश्व

‘अर्थ’बोध : ‘हाऊ टू पिक स्टॉक्स लाईक वॉरन बफे’

अतुल सुळे

गुंतवणूक गुरु वॉरन बफे हे जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानले जातात. ‘फोर्ब्ज’ मासिकाच्या श्रीमंतांच्या यादीतील हे एकमेव  श्रीमंत असे आहेत, की ज्यांनी आपली संपत्ती ‘गुंतवणूक’ या व्यवसायातून मिळविली आहे. त्यांच्या ‘बर्कशायर हाथवे’ या कंपनीच्या एका शेअरचा भाव तीन लाख पन्नास हजार डॉलर म्हणजे अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आर्थिक विश्लेषक टिमोथी वीक यांनी आपल्या ‘हाउ टू पिक स्टॉक्स लाईक वॉरन बफे’ या पुस्तकात, गुंतवणुकीसाठी शेअर निवडताना वॉरन बफे हे विविध कंपन्यांचा कसा अभ्यास करतात, याचे रहस्य वाचकांपुढे उलगडून दाखविले आहे. 

या पुस्तकातील काही ठळक मुद्दे असे 
शेअर बाजार आणि बहुतांश गुंतवणूकदार, लोभ आणि भीती या भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतात. त्याऐवजी निर्णयासाठी ‘मॅथमॅटिक्स’चा आधार घ्या.

चक्रवाढ वृद्धीची ताकद लवकरात लवकर ओळखा व त्या शक्तीचा पुरेपूर उपयोग करून घ्या.

किंमत आणि मूल्य यातील फरक समजून घ्या आणि उत्कृष्ट कंपनी कमीत कमी भावाला खरेदी करा.

ज्या कंपन्या आपले ‘बुक व्हॅल्यू’ सातत्याने वाढवितात, अशा कंपन्यांत दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा.

कोणताही खर्च करताना ‘अपॉर्च्युनिटी कॉस्ट’चा विचार करा.

गुंतवणूक करताना नफा कमविण्यापेक्षासुद्धा, तोटा घरात न आणण्याला जास्ती महत्त्व द्या.

वॉरन बफे यांच्या ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टींग’ या गुंतवणूक पद्धतीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT