Share Market Latest Updates Sakal media
अर्थविश्व

Share Market : एशियन पेंट्स शेअर्समध्ये मिळेल चांगला परतावा...

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एशियन पेंट्सचा निव्वळ नफा 80% पेक्षा जास्त वाढला आहे.

शिल्पा गुजर, Anish

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एशियन पेंट्सचा निव्वळ नफा 80% पेक्षा जास्त वाढला आहे.

एशियन पेंट्सने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल-जून तिमाहीत दमदार निकाल सादर केलेत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एशियन पेंट्सचा निव्वळ नफा (Net Proffit) 80% पेक्षा जास्त वाढला आहे. चांगल्या निकालानंतर ब्रोकरेज हाऊसने एशियन पेंट्सच्या स्टॉकचे टारगेट वाढवले. ब्रोकरेजने प्रति शेअर 3800 रुपये टारगेट दिले आहे. यामध्ये 23 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

सिटी (Citi)

ग्लोबल ब्रोकरेज सिटीने एशियन पेंट्स स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग कायम ठेवली आहे. त्यांनी शेअरचे टारगेट 3050 रुपयांवरून 3400 रुपये केले. ब्रोकरेजनुसार कंपनीची वाढ मजबूत झाली आहे. महसुलात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ दिसून आली आहे. त्यांनी कमाईच्या अंदाजात 10-12% वाढ केली आहे. 26 जुलै रोजी शेअर 3109 रुपयांवर बंद झाला. या किंमतीसह, येत्या काळात सुमारे 10 टक्के परतावा मिळू शकतो.

क्रेडिट सुई (Credit Suisse )

ब्रोकिंग फर्म क्रेडिट सुईसने एशियन पेंट्सला आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. तर प्रति शेअर 3800 रुपये टारगेट दिले आहे. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल उत्कृष्ट होते. मागणीचा कलही मजबूत झाला आहे. FY23/24 साठी EPS अंदाज 3-4% आहे. 26 जुलै 2022 रोजी कंपनीचा शेअर 3109 रुपयांवर बंद झाला. या किंमतीपासून गुंतवणूकदारांना सुमारे 23 टक्के चांगला परतावा मिळू शकतो.

मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley)

ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने एशियन पेंट्सला अंडरवेट रेटिंग दिले आहे. येत्या काळात टॉप-लाइन वाढीवर फोकस आहे. महागाई चिंता कायम आहे. इंडस्ट्री डायनॅमिक्समधील बदल आणि कमी मार्जिनमुळे रेटिंग कमी करण्यात आले आहे. तर टारगेट 2660 रुपयांवरून 2647 रुपये केले. याशिवाय जेपी मॉर्गनने एशियन पेंट्सवर अंडरपरफॉर्म रेटिंग दिले आहे आणि टारगेट 2530 रुपये केले आहे. त्याच वेळी, जेफरीजने अंडरपरफॉर्म रेटिंग देत 2530 रुपये टारगेट ठेवले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT