Atul Sule writes pradhan mantri vaya vandana yojana Senior Citizen Savings Scheme Retirement pillars
Atul Sule writes pradhan mantri vaya vandana yojana Senior Citizen Savings Scheme Retirement pillars sakal
अर्थविश्व

‘पीएमव्हीव्हीवाय’ आणि ‘एससीएसएस’ : निवृत्तांचे आधारस्तंभ

अतुल सुळे

‘प्रधान मंत्री वय वंदन योजना’ (पीएमव्हीव्हीवाय) आणि ‘सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम’ (एससीएसएस) या दोन सरकारी योजना निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाच्या आधारस्तंभ ठरलेल्या आहेत

गेल्या १० वर्षांत मुदत ठेवींवरील व्याजदर सुमारे ३५ ते ४० टक्क्यांनी कमी झाले आहेत व त्यामुळे अशा ठेवींच्या व्याजावर जगणाऱ्यांचे आर्थिक नियोजन संकटात सापडले आहे. घसरते व्याजदर आणि वाढती महागाई अशा दुहेरी संकटात ज्येष्ठ नागरिक सापडले आहेत. शेअर बाजाराचा परतावा अनिश्चित असतो. अशा परिस्थितीत ‘प्रधान मंत्री वय वंदन योजना’ (पीएमव्हीव्हीवाय) आणि ‘सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम’ (एससीएसएस) या दोन सरकारी योजना निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाच्या आधारस्तंभ ठरलेल्या आहेत. कारण या योजना सुरक्षिततेबरोबरच खात्रीशीर व मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा देतात. या दोन्ही योजनांचा तुलनात्मक अभ्यास करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी हितावह ठरेल.

‘पीएमव्हीव्हीवाय’ ही योजना ‘एलआयसी’मार्फत राबविण्यात येते, तर ‘एससीएसएस’ ही योजना पोस्ट ऑफिस व निवडक बॅंकांमार्फत राबविण्यात येते.

  • सध्या या दोन्ही योजनांवर साधारणपणे ७.४० टक्के परतावा देण्यात येत आहे. पण ‘पीएमव्हीव्हीवाय’मध्ये दरमहा ऐवजी दर तिमाही, दर सहामाही वा दरवर्षी परताव्याचा पर्याय स्वीकारल्यास ७.४० टक्क्यांपेक्षा थोडा अधिक परतावा मिळतो.

  • ‘पीएमव्हीव्हीवाय’ची मुदत १० वर्षे आहे. ‘एससीएसएस’ची मुदत ५ वर्षे असून, ती ३ वर्षांनी वाढविता येते.

  • ‘पीएमव्हीव्हीवाय’ ही २०१७ मध्ये सुरू करण्यात आली व २०२० मध्ये तिची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात. ‘एससीएसएस’ ही २००४ पासून अस्तित्वात आहे.

  • ‘पीएमव्हीव्हीवाय’खाली ठरलेला परतावा १० वर्षे कायम राहतो, तर ‘एससीएसएस’चा परतावा गुंतवणुकीच्या वेळच्या दराने कायम राहतो. पण या योजनेच्या व्याजदराचा दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन त्यात बदल होऊ शकतो व तो त्यावेळच्या नव्या गुंतवणूकदारांना लागू होतो.

  • ‘पीएमव्हीव्हीवाय’खाली तीन वर्षांनंतर ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते, तर ‘एससीएसएस’वर कर्ज मिळत नाही.

  • दोन्ही योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

  • ‘पीएमव्हीव्हीवाय’अंतर्गत प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी खाली वजावट मिळत नाही, तर ‘एससीएसएस’मध्ये केलेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर या कलमाखाली वजावट मिळते.

  • ‘पीएमव्हीव्हीवाय’अंतर्गत परतावा दरमहा, दर तिमाहीला, दर सहामाहीला किंवा दरवर्षी मिळू शकतो; तर ‘एससीएसएस’चा परतावा दर तीन महिन्यांनी मिळतो. दोन्ही योजनांचा परतावा करपात्र असतो.

  • ‘पीएमव्हीव्हीवाय’खाली गुंतवलेली रक्कम अडीअडचणीच्या प्रसंगी दोन टक्के दंड भरून परत मिळू शकते. ‘एससीएसएस’मध्ये गुंतवलेली रक्कम मुदतीआधी, एक वर्षानंतर दीड टक्का व दोन वर्षांनंतर एक टक्का दंड भरून परत मिळू शकते.

  • ज्येष्ठ नागरिक वरील दोन्ही योजनांमध्ये प्रत्येकी जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून आपले व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांचे भविष्य सुरक्षित करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT