Book The Joys of Compounding
Book The Joys of Compounding Sakal
अर्थविश्व

‘अर्थ’बोध : ‘द जॉयज् ऑफ कम्पाउंडिंग’

अतुल सुळे

‘द जॉयज् ऑफ कम्पाउंडिंग’ या पुस्तकाचे लेखक गौतम बैद हे ‘चार्टर्ड फायनान्शिअल ॲनॅलिस्ट’ असून, ‘स्टेलर वेल्थ पार्टनर्स’चे संस्थापक आणि फंड मॅनेजर आहेत.

या पुस्तकाचे लेखक गौतम बैद हे ‘चार्टर्ड फायनान्शिअल ॲनॅलिस्ट’ असून, ‘स्टेलर वेल्थ पार्टनर्स’चे संस्थापक आणि फंड मॅनेजर आहेत. अमेरिकेतील एका हॉटेलमधील साहाय्यक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करून फंड मॅनेजर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे आणि हे यश त्यांनी सतत वाचन करून, आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांच्या सहवासात राहून, आपल्यात रोज छोट्या छोट्या सुधारणा करून मिळविले आहे. यालाच ते ‘जॉयज् ऑफ कम्पाउंडिंग’ असे म्हणतात. फक्त पैसा चक्रवाढीने वाढतो असे नाही, तर तुमच्याकडे सातत्य आणि दीर्घदृष्टी असल्यास तुमचे ज्ञान, आरोग्य, सद्भावना, नातेसंबंध यांचेसुद्धा ‘कम्पाउंडिंग’ होते, असे लेखकाचे म्हणणे आहे.

या पुस्तकातील विशेष उल्लेखनीय विचार असे-

  • तुम्ही जेव्हा शेअर खरेदी करता तेव्हा ते एक लॉटरीचे तिकीट आहे असे न मानता, आपण एक व्यवसाय खरेदी करतो आहोत, असे समजा.

  • एखादा नवा व्यवसाय सुरू करणे व तो नावारूपाला आणणे खूपच अवघड असते व खूप भांडवलही लागू शकते. याउलट, अल्पशा रकमेत दोन-तीनदा माऊस क्लिक करून तुम्ही आपल्या आवडत्या व्यवसायाचे ‘छोटे मालक’ होऊ शकता!

  • तुम्ही सर्व शक्ती एकाच व्यवसायात एकवटली आणि काही करणाने तो व्यवसाय अयशस्वी झाल्यास भरपूर वेळ, पैसा, श्रम वाया जाऊ शकतात. परंतु, १०-१५ चांगल्या व्यवसायांचा पोर्टफोलिओ तुम्ही बनविल्यास हा अपव्यय टाळता येतो.

  • उत्तम व्यवसाय आणि उत्तम व्यवस्थापन असलेल्या एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करणे म्हणजे निष्णात ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसण्यासारखे असते.

  • एखाद्या व्यवसायात खूप मोठ्या अडचणी आल्यास त्यातून बाहेर पडणे खूप अवघड असते. परंतु, एखादी कंपनी अडचणीत येत आहे असे वाटल्यास गुंतवणूकदार म्हणून तुम्ही लगेचच बाहेर पडू शकता.

  • गौतम बैद यांचे हे पुस्तक फक्त शेअर बाजारातच नव्हे, तर आयुष्यात ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ कसे करावे, हे शिकविते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : 12 व्या फेरी अखेर ८६,००० मतांनी शशिकांत शिंदे आघाडीवर, उदयनराजे भोसलेंची पिछाडी

Aurangabad Lok Sabha: औरंगाबादमध्ये कांटे की टक्कर, खैरे पिछाडीवर, भूमरे की जलील? कोणी घेतली आघाडी

Kalyan Loksabha: एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर, लवकरच मिळवणार विजयी आघाडी?

Solapur lok sabha result: प्रणिती शिंदेंनी सोलापुरात भाजपचा विजयरथ रोखला? राम सातपुतेंवर 23 हजार मतांची आघाडी

India Lok Sabha Election Results Live : अयोध्येत भाजप पिछाडीवर! बंगालमध्ये पुन्हा ममताचा डंका... तृणमूल काँग्रेसची मोठी आघाडीवर

SCROLL FOR NEXT