Auto Loan Tips
Auto Loan Tips 
अर्थविश्व

Auto Loan Tips : या महत्त्वाच्या गोष्टी वाचा, मगच Car Loan च्या नादी लागा!

Pooja Karande-Kadam

Auto Loan Tips : कार लोनमुळे आणि त्यावरील ईएमआयच्या ओझ्यामुळे अनेक ग्राहक चिंतेत असतात. तुम्हीही कार फायनान्स करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. आम्ही या बातमीत सांगत असलेल्या ४ टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला एक चांगली डील मिळेल.

कार घेण्याइतकं तुमचं बजेट नसलं तर तुम्ही कार फायनान्स करू शकता. आता कंपन्यांनी कार लोन घेण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी केली आहे. तुमचं उत्पन्न आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता पाहून बँका कार लोन देतात. परंतु ईएमआयमुळे ग्राहक चिंतेत असतात.

जर तुम्ही दुचाकी किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर निधीची व्यवस्था करण्यासाठी वाहन कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय आहे. परंतु अनेक वेळा घाईघाईने हे कर्ज घेताना ग्राहकांकडून अशा काही चुका होतात, ज्या पुढे त्यांच्यासाठी त्रासाचे कारण बनतात.

वाहन कर्ज घेताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया. कर्ज परतफेड करण्याची क्षमता कर्ज घेण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या बजेटपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुमच्याकडे परतफेड करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

क्रेडिट स्कोअर

कर्ज घेताना क्रेडिट स्कोअरची काळजी घेणे आवश्यक आहे. चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळविण्यात मदत करतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज मिळते आणि कर्ज घेण्यात अडचण येते. तसेच, तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, वेळेवर परतफेड करणे खूप महत्वाचे आहे.

कर्जाचा व्याजदर

अनेक वेळा असे घडते की कर्ज घेताना ग्राहक व्याजदरांची तुलना करत नाहीत. म्हणजे कर्ज घेताना अनेक बँकांच्या व्याजदरांची तुलना केली तर कमी व्याजाने कर्ज मिळू शकते.परंतु जर तुम्ही योग्य रिसर्च केले नाही तर तुम्ही महागडे व्याज घ्याल.

डाउन पेमेंट

कर्ज घेताना तुम्ही नेहमी डाउन पेमेंट केले पाहिजे. कारण असे न केल्यास तुम्हाला दीर्घकाळ कर्जाची परतफेड करावी लागू शकते. उलट, परतफेड केलेल्या ईएमआयवरील व्याजही अनेक पटीने वाढते. काही छुपे शुल्क देखील

कारचे बजेट

तुम्हाला कोणती कार घ्यायची आहे ही आधीच ठरवा. परंतु तुम्हाला किती रुपयांचं कर्ज मिळतंय यावर तुमच्या कारचा निर्णय अवलंबून असू नये. तुम्ही तुमचं बजेट आणि खर्चाचा विचार करून कारची निवड करा. असं केल्यास तुम्हाला सहज कार लोन मिळेल आणि भविष्यात तुम्हाला कर्ज फेडण्याचं टेन्शन राहणार नाही.

कारण तुम्ही तुमच्या खर्चाचा विचार करूनच ईएमआय ठरवलेला असणार. तुमच्या कार लोनचा हप्ता हा तुमच्या पगाराच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये.

एलिजिबिलिटी आणि ऑफर

एलिजिबिलिटीचा अर्थ बँक लोनसाठीचा क्रायटेरिया तपासणं. तुम्ही कार लोनसाठी पात्र आहात का हे तपासणं खूप गरजेचं आहे. पात्रता म्हणजे तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बँकेने सांगितलेल्या निकषात बसता की नाही हे तपासणं. भारतात अनेक बँका आहेत ज्या तुमच्या पात्रता आणि मॉडेलवर अवलंबून कार कर्जासाठी अनेक स्कीम्स देतात. तुमची सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर तुम्हाला या बँका उत्तमोत्तम डील्स देतात.

मेंटनन्सवरही लक्ष ठेवा
काही डीलर्स तुम्हाला कारबद्दल माहिती न देता महाग किंवा जास्त मेंटनन्स म्हणजे देखभाल खर्च असलेल्या कार विकण्याचा प्रयत्न करू शकतात. हे टाळा. तुम्हाला चांगली डील हवी असल्यास, डीलरला देखभाल खर्चाबाबत विचारा. यामुळे तुम्हाला कार वापरण्यासाठी किती खर्च येईल हे कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT