Axis Bank esakal
अर्थविश्व

येत्या काळात Axis Bank च्या स्टॉकमध्ये मिळेल बंपर नफा

अ‍ॅक्सिस बँकेने सिटीग्रुपचा भारतीय ग्राहक आणि संपत्ती व्यवसाय ताब्यात घेतला होता.

शिल्पा गुजर

अ‍ॅक्सिस बँकेने सिटीग्रुपचा भारतीय ग्राहक आणि संपत्ती व्यवसाय ताब्यात घेतला होता.

खासगी क्षेत्रातील प्रमुख अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) सिटीग्रुपचा ग्राहक बँकिंग व्यवसाय, क्रेडिट कार्ड (Credit Card), रिटेल बँकिंग, ग्राहक कर्ज (Loan) आणि मालमत्ता व्यवस्थापन यासह 12,325 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. बँकेने बुधवारी याबाबत माहिती दिली. या अधिग्रहणानंतर, अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअर्सवर त्यांचे खरेदीचे मत कायम ठेवले आहे आणि गुंतवणूकदारांना नवीन टारगेट दिले आहेत.

अ‍ॅक्सिस बँकेचा सिटीग्रुपशी करार

अ‍ॅक्सिस बँकेने सिटीग्रुपचा भारतीय ग्राहक आणि संपत्ती व्यवसाय ताब्यात घेतला होता. यानंतर, अ‍ॅक्सिस बँकेकडे सिटी बँकेचे सुमारे 30 लाख ग्राहक असतील आणि क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ 31 टक्क्यांनी वाढेल. या घोषणेनंतर, अनेक ब्रोकरेज हाऊसेसने स्टॉकवर त्यांचे खरेदीचे मत कायम ठेवले आहे.

ब्रोकरेज कंपन्यांचे मत ?

CLSA ने अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअर्सवर खरेदी रेटींग कायम ठेवले आहे. शिवाय खरेदीसाठी 1080 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. अ‍ॅक्सिस बँकेला सिटी इंडियाच्या रिटेल व्यवसायाचा फायदा होईल.याशिवाय मॉर्गन स्टॅनलीने (Morgan Stanley) ओवरवेट मत कायम ठेवले असून खरेदीसाठी 910 रुपयांचे टारगेट दिले आहे. दुसरीकडे, जेफरीजनेही आपले खरेदीचे मत कायम ठेवले आहे आणि 1040 रुपयांचे टारगेट दिले आहे.

मॅक्वेरीने (Macquarie) अ‍ॅक्सिस बँकेच्या स्टॉकवर न्यूट्रल रेटींग कायम ठेवले आहे आणि 790 रुपयांचे टारगेट दिले आहे. हा स्टॉक FY23 च्या अंदाजे P/BV च्या 1.8 पटीने ट्रेडिंग करत आहे. याशिवाय जेपी मॉर्गननेही या स्टॉकचे न्यूट्रल रेटिंग कायम ठेवले आहे आणि 770 रुपयांचे टारगेट दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT