Bank Close  Sakal
अर्थविश्व

Bank Close : जानेवारी महिन्यात 14 दिवस बँका सुट्टीवर; ग्राहकांचे होणार हाल, येथे पहा सुट्ट्यांची यादी

तुमचाही या महिन्यात बँकेत जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bank Holiday in January 2023 : नवीन वर्ष सुरू झाले आहे. तुमचाही या महिन्यात बँकेत जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जानेवारी 2023 मध्ये बँकांना दीर्घ सुट्टी असणार आहे. या महिन्यात 4 किंवा 5 नाही तर तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. जर तुमचा बँकेत जाण्याचा विचार असेल तर तुम्ही सुट्ट्यांची संपूर्ण यादी पहा.

आरबीआयने यादी केली जाहीर :

रिझव्‍‌र्ह बँकेच्या संकेतस्थळानुसार, जानेवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांमध्ये शनिवार, रविवार व्यतिरिक्त राज्याच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीलाच बँकांच्या सुट्ट्यांची यादी आरबीआयकडून जारी केली जाते.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

जानेवारीतील बँकांच्या सुट्ट्यांची यादी :

  • 26 जानेवारी - रविवारमुळे देशभरातील बँका बंद.

  • 2 जानेवारी - मिझोरममध्ये बँका बंद राहतील

  • 8 जानेवारी - रविवारमुळे बँका बंद राहतील

  • 11 जानेवारी - मिशनरी डेनिमित्त मिझोराम बँका बंद

  • 12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँक बंद

  • 14 जानेवारी - मकर संक्रांतीनिमित्त देशभरातील बँका बंद.

  • 15 जानेवारी - रविवारमुळे बँक बंद

  • 22 जानेवारी - रविवारमुळे बँक बंद

  • 23 जानेवारी - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आसामच्या बँका बंद.

  • 25 जानेवारी - हिमाचल प्रदेश बँक बंद

  • 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिनानिमित्त बँक बंद

  • 28 जानेवारी - चौथ्या शनिवारमुळे बँक बंद

  • 29 जानेवारी - रविवारमुळे बँक बंद

  • 31 जानेवारी - आसाममध्ये बँकांना सुट्टी असेल.

ऑनलाइन सुविधांचा घेता येईल लाभ :

माहिती देताना बँकेने सांगितले आहे की, शाखा बंद असताना ग्राहक ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊ शकता. ग्राहकांना कोणतेही महत्त्वाचे काम किंवा व्यवहार करायचे असल्यास ते नेटबँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT