bank holiday esakal
अर्थविश्व

नोंव्हेंबरमध्ये बँकांना असणार 17 सुट्ट्या; उरकून घ्या पैश्यांची कामे

देशात विविध भागामध्ये नोव्हेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बँका बंद राहणार आहेत.

सकाऴ वृत्तसेवा

देशात विविध भागामध्ये नोव्हेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बँका बंद राहणार आहेत.

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. त्यामुळे लागोपाठ सुट्ट्या आल्या आहेत. त्यानुसार तुम्हाला बॅंकांना असलेल्या सुट्ट्या लक्षात घेऊन कामाचे नियोजन करावे लागते. हल्ली ऑनलाईन बँकिंग मोठ्याप्रमाणात सुरू झाले असले तरी, बँकेला सुट्टी हा नेहमीच गैरसोयीचा विषय ठरलेला असतो. देशात विविध भागामध्ये नोव्हेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या सुट्ट्यांचे दिवस पाहून तुम्हाला बँकांच्या कामाचे नियोजन करुन आर्थिक व्यवहार पूर्ण करावे लागणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात दिवाळी आहे. त्यानंतर अनेक सण आणि जयंती असे मिळून अनेक भागात 11 दिवस सुट्ट्या असणार आहेत. यासोबत महिन्यातील दोन शनिवार आणि चार रविवार असे पकडून एकूण 17 दिवस बँका बंद राहणार आहेत.

RBI ने नोव्हेंबर महिन्यात जारी केलेल्या सुट्ट्या अशा

1 नोव्हेंबर - कन्नड राज्योत्सव ( बेंगलोर आणि इंफाळमध्ये बँका बंद)

3 नोव्हेंबर - नरका चतुर्दशी - (बेंगळुरूमध्ये बँका बंद)

4 नोव्हेंबर - दिपावली, लक्ष्मीपूजन

5 नोव्हेंबर - बलिप्रतिपदा, विक्रम संवत नवीन वर्ष, गोवर्धन पूजा (अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद)

6 नोव्हेंबर - भाऊबीज, चित्रगुप्त जयंती (गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे बँका बंद)

7 नोव्हेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

10 नोव्हेंबर - छठ पूजा (पाटणा आणि रांची मध्ये बँका बंद)

11 नोव्हेंबर - छठ पूजा - (पाटण्यात बँक बंद)

12 नोव्हेंबर - वंगल उत्सव - (शिलाँगमध्ये बँका बंद)

13 नोव्हेंबर - दुसरा शनिवार

14 नोव्हेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

19 नोव्हेंबर - गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा - (एझोल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद आहेत.)

21 नोव्हेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

22 नोव्हेंबर - कनकदास जयंती (बेंगळुरूमध्ये बँका बंद)

23 नोव्हेंबर - सेंग कुत्स्नाम (शिलाँगमध्ये बँका बंद)

27 नोव्हेंबर - शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

28 नोव्हेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT