rate of interest google
अर्थविश्व

या बँकांच्या ग्राहकांना लाभ; FDच्या व्याजदरात मोठी वाढ

IDFC फर्स्ट बँकेच्या FD साठी नवीन व्याजदर 1 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत. या बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजदरांबद्दल जाणून घेऊ या.

नमिता धुरी

मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर सर्व बँकांनी त्यांची कर्जे, बचत खाती आणि मुदत ठेव योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. काही लोकांना याचा फायदा होईल.

यानंतर कॅनरा बँकेनेही आपल्या बचत खात्याच्या व्याजदरात ५ बेसिस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बँक ग्राहकांना 3.55 टक्के व्याजदर देत आहे. हा नवीन व्याजदर 29 जून 2022 पासून लागू झाला आहे.

त्याच वेळी, IDFC फर्स्ट बँकेने देखील आपल्या FD चे व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. IDFC फर्स्ट बँकेच्या FD साठी नवीन व्याजदर 1 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत. या बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजदरांबद्दल जाणून घेऊ या.

कॅनरा बँक बचत खात्याचे व्याजदर जाणून घ्या :

50 लाखांपर्यंतच्या ठेवींवर - 2.90 टक्के व्याज दिले जात आहे.

50 लाख ते 100 कोटी रुपयांच्या ठेवींवर - 2.90 टक्के व्याज दिले जात आहे.

100 ते 300 कोटी रुपयांच्या ठेवी - 3.10 टक्के व्याज दिले जात आहे.

300 ते 500 कोटी रुपयांच्या ठेवींवर 3.10 टक्के व्याज दिले जात आहे.

500 ते 1000 कोटी रुपयांच्या ठेवींवर - 3.50 टक्के व्याज दिले जात आहे.

1000 कोटींपेक्षा जास्त ठेवींवर - 3.55% व्याज दिले जात आहे.

IDFC फर्स्ट बँकेचे एफडी दर:

7 ते 29 दिवसांच्या एफडीवर - 3.50 टक्के व्याज दिले जात आहे.

30 ते 60 दिवसांची FD - 4.00 टक्के व्याज दिले जात आहे.

91 ते 180 दिवसांच्या एफडीवर - 4.50 टक्के व्याज दिले जात आहे.

181 दिवस ते 1 वर्षाची FD - 5.75 टक्के व्याज दिले जात आहे.

1 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांच्या FD वर - 6.25 टक्के व्याज दिले जात आहे.

3 वर्षे ते 5 वर्षे - 6.50 टक्के व्याज दिले जात आहे, (0.25% ने वाढ).

5 ते 10 वर्षांची FD - 6.00 टक्के व्याज दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT