Berkshire Hathaway Inc. Sakal
अर्थविश्व

Expensive share: जगातील सर्वात महाग शेअर; एका स्टॉकची किंमत तब्बल 4 कोटी रुपये

बर्कशायर हॅथवे इंक हा जगातील सर्वात महागडा स्टॉक आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत तब्बल 4 कोटींहून अधिक आहे.

सकाळ डिजिटल टीम

World Expensive Share: शेअर बाजारात गुंतवणूक करून अनेकजण करोडोंची माया जमवली आहे. भारतातही शेअर बाजारात गुंतवणुकीचा कल झपाट्याने वाढला आहे, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या गेल्या दोन वर्षांत झपाट्याने वाढली आहे.

वास्तविक, गुंतवणूकदारांना नेहमीच सल्ला दिला जातो की एखाद्याने लहान रकमेपासून गुंतवणूक सुरू करावी. चांगल्या परताव्यासाठी लोक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. सर्व स्टॉकच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. बहुतेक किरकोळ गुंतवणूकदार स्वस्त स्टॉकवर लक्ष केंद्रीत करतात. असं असलं तरी जगात एकापेक्षा एक महागडे स्टॉक्स आहेत. काही शेअर्सचे भाव ऐकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. त्यांचा भाव ऐकून त्यात गुंतवणूक करण्याची कल्पनाही सर्वसामान्य व्यक्ती करणार नाही.

जगातील सर्वात महाग स्टॉक-

जगातील सर्वात महाग स्टॉक कोणता? त्या कंपनीचा मालक कोण? हे आज आपण जाणून घेणार आहोत. जगातील सर्वात महागड्या स्टॉकची किंमत ही हजारोत नाही, लाखोत नाही तर करोडोंमध्ये आहे. बर्कशायर हॅथवे इंक हा जगातील सर्वात महागडा स्टॉक आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत तब्बल 4 कोटींहून अधिक आहे.

20 एप्रिलपर्यंत, बर्कशायर हॅथवे इंकच्या शेअरची किंमत 523550 डॉलर (4,00,19,376 रूपये) आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला या कंपनीत पैसे गुंतवायचे आहेत, परंतु ज्याची किमान 4 कोटी रुपये गुंतवायची ताकद असेल, केवळ तोच हा शेअर खरेदी करू शकतो. त्यामुळे बर्कशायर हॅथवे इंकमध्ये (Berkshire Hathaway Inc.) गुंतवणूक करणे हे बहुतेक लोकांसाठी स्वप्नच राहते.

कंपनीचा मजबूत व्यवसाय-

आता या बर्कशायर हॅथवे इंक कंपनीचे प्रमुख कोण आहेत हे जाणून घेऊया. वॉरन बफे यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. वॉरन बफे (Warren Buffett) हे जगातील सर्वात महाग स्टॉक कंपनी बर्कशायर हॅथवे इंकचे प्रमुख आहेत.

जगभरातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना फॉलो करतात. असे म्हणतात की वॉरन बफेट ज्या कंपनीत गुंतवणूक करतात, तिचे दिवस बदलतात. फोर्ब्सच्या मते, वॉरन बफेट यांची बर्कशायर हॅथवेमध्ये 16 टक्के भागीदारी आहे.

कंपनीचा बहुतांश व्यवसाय अमेरिकेत आहे. कंपनीत सुमारे 3,72,000 कर्मचारी काम करतात. बर्कशायर हॅथवे इंक. अमेरिकेशिवाय चीनमध्येही विस्तार करण्याची योजना आहे. 1965 मध्ये जेव्हा वॉरेन बफेट यांनी या टेक्सटाईल कंपनीची कमान हाती घेतली तेव्हा तिच्या शेअरची किंमत 20 डॉलरपेक्षा कमी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT