share market esakal
अर्थविश्व

ITC Shares: मार्चमध्ये 17 टक्क्यांची वाढ, 16 महिन्यांतील उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल

आईटीसी लिमिटेडच्या (ITC Ltd) शेअर्समध्ये मार्चमध्ये जवळपास 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी गेल्या 16 महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

शिल्पा गुजर

Stocks to Buy: आईटीसी लिमिटेडच्या (ITC Ltd) शेअर्समध्ये मार्चमध्ये जवळपास 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी गेल्या 16 महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. आयटीसीच्या प्रतिस्पर्ध्यांच्या शेअर्समध्ये घसरण झालेली असताना त्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून ITC शेअर अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करत आहेत. यामागे स्थिर आर्थिक परिस्थिती, कोरोना महामारी आणि ESG सारख्या अडचणी होत्या.

कोरोना महामारी आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर पुरवठा आघाडीवर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किंमती झपाट्याने वाढल्या असून त्यामुळे एफएमसीजी कंपन्यांच्या इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाली आहे. इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे अनेक एफएमसीजी कंपन्यांचे शेअर्स दबावाला सामोरे जात आहेत. वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे मागणी कमी होत चालल्याचे व्हेंचुरा सिक्युरिटीजचे रिसर्च हेड विनीत बोलिंजकर यांनी सांगितले.

ITC च्या प्रतिस्पर्ध्यांपैकी, गोदरेज कंझ्युमरचे शेअर्स मार्चमध्ये 8 टक्क्यांनी घसरले, नेस्ले इंडियाचे 3%, हिंदुस्तान युनिलिव्हर 8%, डाबर इंडिया जवळपास 7.6% आणि मॅरिको 5.4% घसरले. गोदरेज कंझ्युमर, नेस्ले इंडिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स सलग तिसऱ्या महिन्यात घसरले आहेत, तर डाबर इंडियाचे शेअर्स सलग चौथ्या महिन्यात घसरले आहेत. मॅरिकोचे शेअर्समध्ये सलग पाचव्या महिन्यात घसरण झाली आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मंदीचा ITC वर कमीत कमी परिणाम होईल कारण त्याच्या पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने अन्नपदार्थांचा समावेश असल्याचा विश्लेषकांना विश्वास आहे. कंपनीचा मुख्य व्यवसाय महागाईच्या जोखमींपासून पूर्णपणे मुक्त आहे.

ITC ही देशातील सर्वात मोठी ग्राहक कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांचा व्यवसाय सिगारेट, हॉटेल, कागद आणि कृषी वस्तूंच्या कॅटेगरीमध्ये पसरलेला आहे. स्टेपल्स, कन्फेक्शनरी, नूडल्स, स्नॅक्स आणि बिस्किटे यांसारख्या उत्पादनांसह ब्रँडेड फूड डिव्हिजन चांगली कामगिरी करत आहे.

ब्रोकरचे मत:

ब्लूमबर्गवर ITC च्या स्टॉकवर नजर असलेल्या 36 ब्रोकर्सपैकी 27 ब्रोकर्सने खरेदीचे (BUY) रेटिंग दिले आहे, सात जणांनी स्टॉकची होल्ड (HOLD) म्हणून शिफारस केली आहे आणि फक्त एकाने विक्रीचे (SALE) रेटिंग आहे.

दुसरीकडे एडलवाईस वेल्थ रिसर्चने 450 रुपयांच्या टारगेटसह स्टॉकला खरेदी रेटींग दिले आहे, सध्या हा शेअर 249 रुपयांवर ट्रेड करतोय, म्हणजे एडलवाईसने दिलेले रेटींग सध्याच्या किंमतीपेक्षा जवळपास 80 टक्क्यांनी जास्त आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये सर्वात मोठा बदल! पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार, फक्त 'या' गोष्टीवरून तुमची ओळख पटणार

Pune News : नवले पूल येथे तातडीने उपाययोजना करा; नितीन गडकरींचे आदेश

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

समझो हो गया...! Smriti Mandhana ने एकदम स्टाईलमध्ये दाखवली एंगेजमेंट रिंग! जेमिमा रोड्रिग्सने शेअर केला Video

SCROLL FOR NEXT