Inflation
Inflation Sakal
अर्थविश्व

चलनवाढीला ‘ब्रेक’, उत्पादनाला गती

पीटीआय

नवी दिल्ली - कोरोना संसर्गामुळे (Corona Infection) ठप्प झालेल्या अर्थचक्राला आता गती येऊ लागली असून देशातील किरकोळ महागाईचा (Inflation) दर जुलै महिन्यात कमी झाला असून तो ५.५९ टक्क्यांवर आला आहे. ग्राहक निर्देशांकावर आधारित महागाईचा दर मे महिन्यात ६.३० टक्के तर जून महिन्यात ६.२६ होता. कोरोनामुळे स्थानिक पातळीवर लादलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या तसेच इंधनाचे दर (Fuel Rate) वाढल्याने महागाईही वाढली होती. आता मात्र हा दर साडेपाच टक्क्यांच्या मर्यादेत आल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मागील वर्षीच्या जुलै महिन्यात हाच दर ६.७३ टक्के होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात अन्नधान्यामुळे होणारी चलनवाढ ५.१५ टक्के होती, ती जुलैमध्ये ३.९६ टक्के एवढी कमी झाली. रिझर्व्ह बँकेने नुकतेच द्वैमासिक पतधोरणाच्यावेळी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत महागाईचा दर ५.९ टक्के राहील असा अंदाज वर्तविला होता. रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय धोरण समितीने चलनवाढीचा आदर्श दर ६ टक्क्यांच्या आत राहायला हवा असे उद्दिष्ट ठेवले आहे. जुलैमधील दर आता त्या टप्प्यातच आहे, असेही दाखवून दिले जात आहे.

खाण, ऊर्जा, उत्पादनाला गती

जून महिन्यातील देशाचे औद्योगिक उत्पादन १३.६ टक्क्यांनी वाढले असून खाण, ऊर्जा तसेच उत्पादन क्षेत्रात वाढ झाल्याने ही मजल मारता आली. यावर्षी जून महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक १२२.६ टक्के होता तर गेल्यावर्षीच्या जूनमध्ये तो १०७.९ टक्के होता. जून २०१९ मध्ये हाच निर्देशांक १२९.३ टक्के होता. म्हणजेच गेल्यावर्षीपेक्षा औद्योगिक उत्पादन वाढले असले तरी कोरोनापूर्व काळापेक्षा ते अद्याप कमीच आहे. फेब्रुवारीपर्यंत औद्योगिक उत्पादन कमी होते, मात्र नंतर ते वाढत गेले. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात उत्पादन क्षेत्र १३ टक्क्यांनी वाढले. या क्षेत्राचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७७.६३ टक्के वाटा असतो. याच कालावधीत खाणकाम क्षेत्रातील उत्पादन २३.१ टक्क्यांनी तर ऊर्जानिर्मिती ८.३ टक्क्यांनी वाढली.

अशीही घट

जून २०२० मध्ये उत्पादन क्षेत्र १७ टक्क्यांनी रोडावले होते, तर खाण क्षेत्रातील उत्पादन १९.५ टक्के घटले. वीज उत्पादनालाही याच काळात १० टक्क्यांचा शॉक बसला होता. कोरोना फैलावाच्या असामान्य परिस्थितीत कोरोनापूर्व काळाची आकडेवारी व आताची आकडेवारी यांची तुलना करणे योग्य ठरणार नाही, असे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन या जूनमध्ये ३०.१ टक्क्यांनी वाढले तर जून २०२० मध्ये ते ३४.८ टक्के कमी झाले होते.

कोरोनाचा फटका

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च महिन्यात औद्योगिक उत्पादन १८.७ टक्क्यांनी घटले होते. ऑगस्टपर्यंत ते कमीच (उणे दर) राहिले, नंतर निर्बंध उठल्यावर ते वाढत गेले. ते सप्टेंबरमध्ये एक टक्का तर ऑक्टोबरमध्ये साडेचार टक्क्यांनी वाढले. नोव्हेंबरमध्ये ते दीड टक्का घसरल्यावर पुन्हा त्यापुढील महिन्यात ते २.२ टक्के वाढले. त्यानंतर मार्चमध्ये त्यात २४.२ टक्के एवढी तर मे महिन्यात २८.६ टक्के एवढी भरीव वाढ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT