share_20market_0_0.jpg 
अर्थविश्व

Share Market: सेन्सेक्सची 4 महिन्यातील सर्वात चांगली कामगिरी, निफ्टी 14500 च्या वर

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- डिसेंबरच्या तिमाहीत कंपन्यांनी केलेल्या जबरदस्त कामगिरी आणि मजबूत जागतिक संकेतांच्या जोरावर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 834 अंक उसळला, जी चार महिन्यातील उठावदार कामगिरी ठरली. निफ्टीनेही 14500 चा आकडा पार केला. बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये 7 टक्के आणि बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी पाहायला मिळली. 

बाजारातील आजच्या तेजीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आर्थिक शेअर्सची महत्त्वाची भूमिका राहिली. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स 834 अंक म्हणजेच 1.7 टक्क्यांच्या वाढीसह 49398.29 अंकावर बंद झाले. निफ्टी 239.85 अंक म्हणजेच 1.68 टक्क्यांच्या वाढीसह 14521 वर बंद झाला. निफ्टीची 5 नोव्हेंबरनंतरची ही सर्वात चांगली कामगिरी होती. 

बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचडीएफसी, आईसीआईसीआई बँक और एलअँडटी आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये 1.5 ते 2.5 टक्क्यांची तेजी राहिली. यापूर्वी सलग दोन दिवस शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT